मुंबई : भारतीय संघ सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ही मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला, पण ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाने पलटवार करत भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला. अशात, या कसोटी मालिकेतील काही अंतर्गत गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. त्यानुसार, ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फलंदाज ग्रेग चॅपल यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे त्या वक्तव्याची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. (IND vs AUS Border Gavaskar Trophy India vs Australia Test Series Travis Head Jasprit Bumrah Greg Chappell)
ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्रात माजी फलंदाज ग्रेग चॅपल यांचा एक कॉलम प्रसिद्ध झाला आहे. या कॉलममध्ये ग्रेग चॅपल यांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ट्रॅव्हिस हेड आणि जसप्रीत बुमराह यांच्यात सुरू असलेल्या लढतीबद्दल लिहिलं आहे. त्यानुसार, “आत्तापर्यंत असे दिसते की बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका नसून भारत विरुद्ध ट्रॅव्हिस हेड आणि जसप्रीत बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका आहे. हे दोन्ही खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. ट्रॅव्हिस हेडसारखी तोड जसप्रीत बुमराहकडे नाही. हेड हा वेगवान गोलंदाज बुमराहा याच्यासमोर सामान्य गोलंदाज असल्यासारखे खेळत आहे”, असे त्यांनी लिहिले आहे.
याशिवाय, “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ट्रॅव्हिस हेडने 3 सामन्यात 409 धावा केल्या असून, बुमराहने या 3 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. त्यानुसार, गोलंदाजीत बुमराहची बरोबरी कोण करू शकत नाही. त्याचप्रमाणे फलंदाजीत हेडच्या जवळपास कोणी नाही. या मालिकेतील जसप्रीत बुमराहविरुद्ध ट्रॅव्हिस हेडची कामगिरी त्याच्या निर्भय दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. जिथे बहुतेक फलंदाजांना बुमराहची अपरंपरागत कृती, वेग आणि सातत्यपूर्ण अचूकता टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे”, असेही त्यांनी लिहिलं आहे.
त्याचप्रमाणे, “उद्देशाने खेळून आणि बुमराहच्या चेंडूवर धावा काढण्याचा प्रयत्न करून, हेडने केवळ त्याचा धोका कमी केला नाही तर त्याची लय देखील विस्कळीत केली. शॉर्ट बॉल्सवर हल्ला करून आणि पूर्ण लांबीचे चेंडू टाकून, पण अचूकतेने बॅट स्विंग करण्याची त्याची क्षमता आहे. हेडच्या आक्रमक वृत्तीने बुमराहला त्रास दिला आहे”, असेही चॅपल यांनी लिहिलं आहे.
या मालिकेत ट्रॅव्हिस हेडला जसप्रीत बुमराहने दोनदा बाद केले आहे. हेडने या मालिकेत दोन शतके झळकावली असून पर्थमध्ये त्याने 89 धावांची खेळी खेळली आहे. दरम्यान, हेड हा ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार होऊ शकतो, असा अंदाज ग्रेग चॅपलने वर्तवला आहे. गेली तीन वर्षे तो ज्या प्रकारची कामगिरी करत आहे, ते पाहता भविष्यात त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. माझा विश्वास आहे की ट्रॅव्हिस हेड गेल्या तीन वर्षांत जागतिक क्रिकेटमधील सर्वात सुधारित फलंदाज आहे आणि त्यामुळे पुढील ऑस्ट्रेलियन कर्णधार बनण्याची त्याची शक्यता अधिक मजबूत आहे”, असे त्यांनी लिहिलं आहे.
हेही वाचा – Champions Trophy 2025 : प्रतीक्षा संपली! स्पर्धेचे वेळापत्रक आले समोर; भारत-पाकिस्तान सामना कधी?
Edited By Vaibhav Patil