Champions Trophy 2025 : मुंबई : एकही सामना न गमावता भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. रविवार, 9 मार्च रोजी दुबईत अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र, हा अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार असल्याने क्रिकेटपटूंसोबतच चाहत्यांमध्येही धाकधूक आहे. कारण, कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना जर रविवारी खेळवला जात असेल तर तो रविवार काही भारताला लाभताना दिसत नाही. भारतीय संघ आणि रोहित शर्मा आज हा समज तोडण्यात यशस्वी होतील का, हे लवकरच आपल्याला कळेल. (ind vs aus champions trophy final team india lost sunday finals record rohit sharma)
एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा हा भारताचा कर्णधार आहे. रविवारी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी न्यूझीलॅंड सोबत खेळणार आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. तर न्यूझीलॅंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारत परत एकदा रविवारी आयसीसी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे. मात्र, अशा महत्त्वाच्या सामन्यांसाठी भारताला रविवार काही लाभताना दिसत नाही. टी20 विश्वचषक, 50 षटकांचा विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारत हरला आहे.
हेही वाचा – Champions Trophy Final : आज चॅम्पियन्सचा महामुकाबला! दुबईत रंगणार भारत-न्यूझीलंड फायनल
रविवारी खेळले गेलेले अंतिम सामने
आजपर्यंत जेवढ्या आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने रविवारी खेळवले गेले आहेत, त्यातील केवळ एकाच सामन्यात भारत जिंकला आहे. ऊर्वरित सर्व सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी खेळवल्या गेलेल्या पाच आयसीसी ट्रॉफी भारताने गमावला आहे.
2000 मध्ये भारत आणि न्यूझीलॅंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला गेला. हा सामना भारत चार विकेट्सनी गमावला होता.
2003 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विश्वचषकाचा एकदिवसीय सामना खेळवला गेला. हा सामना 23 मार्च रोजी झाला, तो दिवस रविवार होता. आणि भारत हा सामना 123 धावांनी हरला.
2014 मध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यान टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. 6 एप्रिल 2014 रोजी झालेला हा सामना देखील रविवारीच झाला. आणि भारताने हा सामना 6 विकेट्सनी गमावला.
2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रविवारी खेळवला गेला. भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात हा सामना झाला. तब्बल 180 धावांनी भारत या सामन्यात पराभूत झाला.
2023 मधील एकदिवसीय विश्वचषकाचा सामना देखील रविवारी अहमदाबादेत खेळवण्यात आला. संपूर्ण विश्वचषकात एवढी उत्तम कामगिरी करूनही हा अखेरचा सामना आणि पर्यायाने जगज्जेतेपद भारताला गमवावे लागले होते.
रविवारी जिंकलेले एकमेव अंतिम सामना
2007 मध्ये भारताने टी20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 24 सप्टेंबर रोजी खेळला होता. यात भारताने पाकिस्तानला हरवले होते. हा सामना सोमवारी झाला होता. त्यानंतर 2011 चा वर्ल्डकप देखील भारताने जिंकला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेला हा सामना शनिवारी झाला. 2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकला होता. हा सामना इंग्लंडविरोधात खेळवला गेला. तो दिवस रविवार होता. भारताने रविवारी जिंकलेला हा एकमेव अंतिम सामना आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने कसली कंबर, राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती