घरICC WC 2023IND vs AUS Final : पराभवानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ BCCI...

IND vs AUS Final : पराभवानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ BCCI कडून ट्वीट

Subscribe

अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघाने 6 गड राखत पराभव केला. यानंतर भारतीय खेळाडूंसह चाहत्यांचे अश्रूचा बांध फुटला. यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नेमके काय वातावरण हे जाणून घेण्यासाठी सर्वजणांच उत्सुकता होती. बीसीसीआयने भारतीय संघाचा ड्रेसिंग रुमचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना हा गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे आव्हान दिले होते. तर ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखत भारताचा पराभव केला. पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सिराजला मैदानावरील इतर सहकाऱ्यांनी सांभाळले. या प्रसंगाचा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमध्ये काय वातावरण असेल, यासंदर्भात अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs AUS Final : पराभवानंतर खेळाडूंसमोर जाण्याची हिंमत नव्हती – राहुल द्रविड

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पराभानंतर बीसीसीआयने भारतीय संघाचा व्हिडीओ ट्वीट केले आहे. या व्हिडीओमध्ये सामन्यानंतर भारतीय संघाच्या उत्तम क्षेत्ररक्षणासाठी ‘मेडल सेरेमनी’चे दृश्य दिसत आहे. यात अंतिम सामन्यानंतर विराट कोहलीचा हे मेडल देण्यात आले आहे. या व्हिडीओत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंचे आत्मविश्वास वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – World Cup 2023: भारताच्या पराभवानंतर खचला विराट कोहली; अनुष्का शर्माने पतीला मिठी मारून दिली हिंमत

व्हिडीओत नेमके काय म्हटले?

टी दिलीप ड्रेसिंग रुपमध्ये म्हणाले, “विश्वचषक स्पर्धेत पराभव झाल्याचे सर्वांनाच दु:ख होत आहे. पण हा खेळ आहे, आजच्या सामन्यात आपण जे जे शक्य होते, ते सर्व केले आहे. पण अंतिम सामन्याचा निकाल हा आपल्या बाजूने आला नाही. राहुल द्रविडने सांगितले की, सगळ्यांना स्वत:चा अभिमान वाटायला हवा. मी भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन करत आणि आभार मानतो,”असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – WC 2023 Final : संजय मांजरेकरांमुळे भारत हरला? युझर्सची टीका, अहमदाबादच्या प्रेक्षकांवरही राग अनावर

टी दिलीप पुढे म्हणाले, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत तुम्ही स्वत:ला क्षेत्ररक्षणात झोकून दिले असून क्षेत्ररक्षणात तुम्ही प्रचंड ऊर्जा आणली. आणि आपण सर्वजण मैदानावर एकमेकांसाठी उभे राहिलो, ही सगळ्यात आवडलेली गोष्ट आहे. आजच्या क्षेत्ररक्षणाचा विनर हा विराट कोहली आहे. विराट हा एक भन्नाट खेळाडू आहे. तो प्रत्येक मैदानावर जादू करतो”, असे म्हणत टी दिलीपने विराट कोहलीवर कौतुकांचा वर्षाव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -