घरICC WC 2023IND vs AUS Final : पराभवानंतर खेळाडूंसमोर जाण्याची हिंमत नव्हती - राहुल...

IND vs AUS Final : पराभवानंतर खेळाडूंसमोर जाण्याची हिंमत नव्हती – राहुल द्रविड

Subscribe

अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने पराभव केला. भारतीय संघाच्या पराभवानंतर खेळाडूंसह चाहत्यांचे अश्रू अनावर झाल्याचे चित्र आपण टीव्हीवर पाहिले आहे. पण भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमध्ये देखील सर्व खेळाडू रडत होते. पराभवानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंसमोर जाण्याची हिंमत नव्हीत, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदे वेळी दिली आहे.

भारतीय संघाच्या पराभवानंतर ड्रेसिंग रुपमधील वातावरणासंदर्भात विचारल्यावर राहुल द्रविड म्हणाले, “आज झालेला पराभव हा निराशाजनक असून ड्रेसिंग रुपमध्ये प्रत्येक खेळाडू हा भावनिक झाला होता. मला प्रशिक्षक म्हणून खेळाडूसमोर जाण्याची देखील हिंमत झाली नाही. कारण मला माहिती आहे की, मुलांनी इथे येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि एक प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना असे पाहावत नव्हते. मी सर्व खेळाडूंना वैयक्तिक ओळखतो.”

- Advertisement -

हेही वाचा –IND vs AUS Final : पराभवानंतर भारतीय खेळाडू भावूक; रोहित-सिराजच्या डोळ्यांत अश्रू

खेळात चढ-उतार येत असतात

राहुल द्रविड पुढे म्हणाले, “भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेसाही खूप मेहनत घेतली आहे. पण हा खेळ आहे आणि त्या दिवसाचा सर्वोत्तम संघ विजय होतो आणि हे पराभवातून शिकलो आहे. इतरांप्रमाणे आम्ही ही पुढे जाऊ. खेळात चढ-उतार हे येत असतात. पण तुम्ही येथेच थांबून चालत नाही. कारण तुम्ही प्रत्यत्न करणार नाही. तर पुनरागमन कसे करता कराल”, असे राहुल द्रविडने म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – BCCI: भारतीय संघासोबतच राहुल द्रविडचा प्रवासही संपला? लवकरच मोठी घोषणा

राहुल द्रविडचा भारतीय संघासोबतचा प्रवास संपला?

विश्वचषक फायनलनंतर द्रविडने टीम इंडियासोबतच्या भविष्याबद्दल सांगितले, ‘मी याबद्दल विचार केलेला नाही. मी नुकताच सामना संपवला आहे. मला याचा विचार करायला वेळ नाही. होय, मला वेळ मिळेल तेव्हा ते करेन, पण सध्या माझे संपूर्ण लक्ष या मोहिमेवर होते. माझे लक्ष या विश्वचषकावर होते आणि माझ्या मनात दुसरे काही नव्हते आणि भविष्यात काय होईल याचा मी अजून विचार केलेला नाही.

हेही वाचा – Travis Head : रोहित शर्माबाबत ट्रॅव्हिस हेडचे विधान चर्चेत; सामना जिंकल्यानंतर काय म्हणाला?

मैदानात रोहित रोहित शर्मा, विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी

पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सिराजला मैदानावरील इतर सहकाऱ्यांनी सांभाळले. या प्रसंगाचा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -