अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. या पराभवाचा खेळाडूंना नाही तर भारतीय चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सिराजला मैदानावरील इतर सहकाऱ्यांनी सांभाळले. या प्रसंगाचा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (IND vs AUS Final Indian players emotional after defeat Tears in Rohit sharma Mohammed siraj eyes)
हेही वाचा – विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळाले 33 कोटी; भारतीय संघाला ‘एवढ्या’ रकमेवरच…
विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 240 धावा करू शकला. दरम्यान, केएल राहुलने 107 चेंडूत सर्वाधिक 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा आणि सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत केवळ 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
हेही वाचा – WorldCup : विश्वचषक आतापर्यंत कोणत्या देशाने कधी जिंकला? सर्व माहिती एका क्लिकवर
भारताकडून मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट गमावून सामना जिंकत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 120 चेंडूंत 137 धावांची सर्वाधिक खेळी केली. याशिवाय मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 तर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. या पराभवामुळे रोहित शर्मा कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकला नाही. कपिल देव यांनी 1983 मध्ये आणि धोनीने 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकवून दिला आहे.
View this post on Instagram
भारतीय खेळाडू भावूक
ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे प्रत्येक भारतीय खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीनेही टोपीने चेहरा लपवून आपल्या वेदना लपवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्माने आपले अश्रू आवरले आणि तो थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. मात्र मोहम्मद सिराज मैदानावरच रडू कोसळले. जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल त्याचे सांत्वन केले. डागआऊटमधील स्टाफसुद्धा रडताना दिसला.