मुंबई : विश्वचषक स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजला अश्रू अनावरण झाले. भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा पराभवाचे दु:ख सहन करत असतानाच आईची तब्येत बिघडली. मोहम्मद शमीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे मोहम्मद शमीच्या आईची तब्यात बिघडल्याची माहिती बहिणी शबिनाने प्रसार माध्यमांना माहिती दिली.
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच शमींची आई अंजुम आरा या आजारी पडल्या होत्या. यानंतर शमीच्या आईला डॉक्टरांकडे नेहण्यात आले असून त्यांच्या चाचण्या देखील केल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले. शमीच्या आईने विश्रांती घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी पाठवण्यात आले. पण भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा आईची तब्यात बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा – IND vs AUS Final : पराभवानंतर भारतीय खेळाडू भावूक; रोहित-सिराजच्या डोळ्यांत अश्रू
आईची प्रकृती स्थिर
मोहम्मद शमीची बहिण शबिना म्हणाल्या, आईला दोन दिवसांपूर्वीच ताप आला होता. पण रविवारी सकाळी आईचा ताप वाढला होता आणि आईला माध्यमांशी बोलताना अधिक वेदना जानवू लागल्यानंतर तिला झोया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी आईला दुपारी औषधे देऊन घरी परत आणली. भारतीय संघाच्या पराभवानंतर पुन्हा आईची तब्यात बिघडली आणि तिला पुन्हा रुग्णालयात दाखळ केले. सध्या आईची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती शमीच्या बहिणीने दिली.
हेही वाचा – WC 2023 Final: भारताच्या पराभवावर बाबर आझमचं वक्तव्य चर्चेत; भारतीय चाहत्यांचा संताप
असा झाला सामना
विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 240 धावा करू शकला. दरम्यान, केएल राहुलने 107 चेंडूत सर्वाधिक 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा आणि सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत केवळ 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
हेही वाचा – WC Final 2023 : कपिल देव यांना निमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया
भारताकडून मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट गमावून सामना जिंकत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 120 चेंडूंत 137 धावांची सर्वाधिक खेळी केली. याशिवाय मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 तर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. या पराभवामुळे रोहित शर्मा कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकला नाही. कपिल देव यांनी 1983 मध्ये आणि धोनीने 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकवून दिला आहे.