घरICC WC 2023IND vs AUS Final : सचिन तेंडुलकरकडून भारतीय संघाचे सांत्वन; दुखावलेल्या मनावर...

IND vs AUS Final : सचिन तेंडुलकरकडून भारतीय संघाचे सांत्वन; दुखावलेल्या मनावर फुंकर घालण्याचा प्रयत्न

Subscribe

मुंबई : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. त्यामुळे भारतीय संघाचे तिसऱ्यांजा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवाचा खेळाडूंना नाही तर भारतीय चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. भारताच्या पराभवानंतर क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही भावूक झाला. त्याने ट्विटरच्या माध्यमातून भारतीय संघाचे सांत्वन केले आहे. (IND vs AUS Final Sachin Tendulkar Consolation for Indian Team Trying to blow over a hurt heart Narendra Modi Stadium)

हेही वाचा – Travis Head : रोहित शर्माबाबत ट्रॅव्हिस हेडचे विधान चर्चेत; सामना जिंकल्यानंतर काय म्हणाला? 

- Advertisement -

सचिन तेंडुलकरने ट्वीट करताना म्हटले की, ऑस्ट्रेलियाने सहावा विश्वचषक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांनी महत्त्वाच्या दिवशी सर्वात मोठ्या मंचावर उत्कृष्ट क्रिकेट खेळले. भारतीय संघालाही शुभेच्छा, स्पर्धेत फक्त एक वाईट दिवस हृदयद्रावक असू शकतो. मी खेळाडू, चाहते आणि हितचिंतकांच्या वेदनांची कल्पना करू शकतो आणि त्यांना काय त्रास होत असेल, हे मला माहित आहे. परंतु पराभव हा खेळाचा एक भाग आहे, पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या संघाने संपूर्ण स्पर्धेत आपल्याला आनंद दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान, सचिन तेंडुलकर रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी उपस्थित होता. त्याने सामन्यापूर्वी विराट कोहलीला 2011 विश्वचषकातील आपली जर्सी भेट दिली होती. याशिवाय तो संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचे भक्कम समर्थन करताना दिसला.

ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने विजय

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 240 धावा करू शकला. केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 54, 47 धावांचे आणि सूर्यकुमार यादवने 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. भारताकडून मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट गमावून सामना जिंकत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 120 चेंडूंत 137 धावांची सर्वाधिक खेळी केली.  याशिवाय मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 तर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हेही वाचा – WC 2023 Final : संजय मांजरेकरांमुळे भारत हरला? युझर्सची टीका, अहमदाबादच्या प्रेक्षकांवरही राग अनावर 

ऑस्ट्रेलियाने सहा वेळा पटकावले विजेतेपद

दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद फक्त 240 धावाच करू शकला. या धावांचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि मार्नस लॅबुशेनच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 अशाप्रकारे सहा वेळा विश्वचषक जिंकला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -