नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. या पराभवाचा खेळाडूंना नाही तर भारतीय चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. अजूनही या धक्क्यातून भारतीय चाहते सावरलेले नाहीत. अशातच आता भारतीय संघ अंतिम सामन्यात फलंदाजी करत असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने लाइव्ह टीव्ही कार्यक्रमात एक विधान केले. त्याने म्हटले की, कधी कधी अतिआत्मविश्वास तुम्हाला खड्ड्यात घालतो. भारताच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ind vs Aus Final Shahid Afridis video surfaced What was said while targeting the Indian batsmen)
हेही वाचा – Kapil Dev : विश्वचषक सामन्याचे आमंत्रण नाही, पण पराभवानंतर कपिल देव यांचा भारतीय संघाला पाठिंबा
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान शाहीद आफ्रिदीसह मोहम्मद युसूफही पॅनेलमध्ये उपस्थित होता. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पहिल्या पॉवरप्लेमध्ये भारतीय डाव अडचणीत आला असताना शाहीद आफ्रिदीने भारतीय फलंदाजांवर निशाणा साधला. शुभमन गिल निष्काळजीपणे, रोहित शर्मा अनावश्यक शॉटवर आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी केलेले विधान सध्या व्हायरल होत आहे.
India 🇮🇳 will lose this World Cup because of their overconfidence – Shahid Afridi 😳pic.twitter.com/cBlNsAjR1F
— H A M Z A 🇵🇰 (@HamzaKhan259) November 19, 2023
सामन्याच्या 11व्या षटकात श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर अँकरने शाहिद आफ्रिदीला विचारले की, हे मोठ्या खेळाचे दडपण आहे का? यावर आफ्रिदी म्हणाला की, ‘नाही, हे मोठ्या खेळाचे दडपण नाही. भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. एवढ्या गर्दीसमोर भारतीय खेळाडू खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे पूर्णपणे दबावावर आधारित आहेत. हे भारतीय खेळाडूंना माहित आहे. भारतीय संघ या विश्वचषकात सतत सामने जिंकत आला आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि ही गोष्ट त्यांना खड्ड्यात घालत आहे. कारण ज्या चेंडूवर तिन्ही खेळाडू बाद झाले आहेत, त्यावर विकेट जाणे अशक्य होते.
हेही वाचा – IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरसह ‘हे’ दिग्गज खेळाडू भारताविरुद्ध T20 मालिका खेळणार नाहीत
दरम्यान विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने 81 धावांवर आपल्या 3 विकेट गमावत दडपणाखाली गेला. केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 54, रोहित शर्माने 47 धावांचे आणि सूर्यकुमार यादवने 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट घेतल्यामुळे भारतीय संघाने सर्वबाद फक्त 240 धावांच केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा सहज पाठलाग करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.