घरICC WC 2023IND vs AUS FINAL : फायनलपूर्वी दोन्ही कर्णधारांमध्ये शाब्दिक युद्ध; पूर्वसंध्येला पत्रकार...

IND vs AUS FINAL : फायनलपूर्वी दोन्ही कर्णधारांमध्ये शाब्दिक युद्ध; पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत काय घडले?

Subscribe

अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC ODI WORLD CUP 2023) अंतिम सामना भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते आणि ऑस्ट्रेलियाने एकतर्फी सामना जिंकला होता. परंतु यावेळी भारतीय संघाला 20 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघ आतापर्यंत सर्व 10 सामने जिंकून अपराजित राहीला असून अंतिम फेरीतही विजय मिळवायचा आहे. अशातच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी पत्रकार परिषद घेत उद्याच्या रणनितीवर भाष्य केलं आहे. (IND vs AUS FINAL War of words between both captains Rohit Sharma Pat Cummins before the final What happened at the press conference on the eve)

रोहित शर्मा म्हणाला की, जेव्हापासून तो कर्णधार झाला तेव्हापासून त्याने प्रत्येक फॉरमॅटसाठी खेळाडूची निवड करण्यास सुरुवात केली आहे आणि प्रत्येकाला आपापली भूमिका दिली आहे. त्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या असून संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. आम्ही या दिवसासाठी जी काही तयारी केली आहे, ती मी कर्णधार झाल्यापासूनच  सुरू केली आहे. आधी टी-20 विश्वचषक, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर आम्ही खेळाडूंची निवड करण्यास सुरुवात केली. ही प्रक्रिया अडीच वर्षे चालली. आम्ही काही खेळाडूंना निवडले आणि त्यांना त्यांची भूमिका सांगितली. आतापर्यंत त्या सर्वांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. सर्व खेळाडू चांगले योगदान देत असल्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत. कोणता खेळाडू सलामीला येणार, फलंदाजी करणार आणि कुठे क्षेत्ररक्षण करणार हे सर्व स्पष्ट होते. आतापर्यंत विश्वचषकात आम्ही चांगेल प्रदर्शन करू शकलो आहे. त्यामुळे आशा करतो की उद्याही चांगले प्रदर्शन करू.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs AUS WC Final : भारतीय संघ एकमेव बदलासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार? ‘अशी’ असेल प्लेइंग इलेव्हन

उद्याचा सामना खूपच रंजक होणार आहे, हे स्पष्ट करताना रोहित शर्मा म्हणाला की, दोन्ही संघ अंतिम सामना खेळण्यास पात्र आहेत. ऑस्ट्रेलिया काय करू शकते हे आम्हाला ठाऊक आहे. पण आमचे लक्ष आमच्या कामगिरीवर असणार आहे. त्यामुळे विरोधी संघ काय करतो याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही आमच्या योजनेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आजच्या सराव सत्राबाबत बोलताना रोहित म्हणाला की, “हे एक ऐच्छिक सराव सत्र होते. आम्ही ते सामन्यापूर्वी ठेवतो, जेणेकरून खेळाडू त्यांना हवे ते करू शकतील. आम्हाला माहित आहे की, संघाच्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे. उद्याच्या सामन्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. परंतु उद्याच्या सामन्याआधी खेळाडूच्या आजूबाजूचे वातावरण हलके राहील आणि कोणावरही दबाव येणार नाही, याचीही काळजी आम्ही घेत आहोत.

- Advertisement -

गोलंदाजांचे कौतुक

गोलंदाजांचे कौतुक करताना रोहित म्हणाला की, “गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आमच्या गोलंदाजांनी विरोधी संघाला 300 च्या आत नेऊन खूप चांगली कामगिरी केली आहे. फिरकीपटूंनीही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. शमी, सिराज, बुमराह यांना माहित आहे की त्यांना काय करायचे आहे. फिरकीपटूंना माहित आहे की त्यांना मधल्या षटकांमध्ये विकेट्स घ्यायच्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रत्येकाने आपली भूमिका चोख बजावली आहे.”

हेही वाचा – अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून वाद घालण्याचा प्रयत्न; अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य चर्चेत

स्वप्ने उद्या पूर्ण होतील!

अंतिम सामन्याबाबत रोहित म्हणाला की, “तुम्ही जे काही स्वप्न पाहता, ते यासाठी पाहता की, उद्या असाच दिवस असेल. एखाद्या खेळाडूसाठी सर्वात मोठे आव्हान असते की, तुम्ही त्या दिवशी कशी कामगिरी करता. याकडे सर्व 11 खेळाडूंचे लक्ष असेल. अशा परिस्थितीत कोणत्याही दडपणाखाली असण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही दडपणाखाली नसाल तर तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला चांगले निर्णय घेता यावेत यासाठी फलंदाजांपासून ते गोलंदाजापर्यंत तुम्ही शांत राहणे आवश्यक आहे. मी 50 षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालो आहे, त्यामुळे उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असेल. मला संघासाठी काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि बाकी सर्व काही बाजूला ठेवावे लागेल.

प्लेइंग 11 उद्या ठरणार

15 पैकी कोणीही खेळू शकतो, असे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, आमचे 12-13 खेळाडू ठरलेले आहेत. पण उद्या एकदा खेळपट्टी पाहून निर्णय घेऊ. खेळपट्टी कशी असे हे पाहावे लागेल. त्यानंतरच उद्याची प्लेइंग 11 ठरवू, असे रोहित शर्मा म्हणाला.

कमिन्सच्या विधानाशी सहमत नाही

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मोठे सामने खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याचा फायदा होईल, असे पॅट कमिन्स म्हटले आहे. यावर रोहित म्हणाला की, “त्या खेळाडूंना फायनल खेळण्याचा अनुभव आहे. परंतु खेळाडूंचा सध्याचा फॉर्म, सध्याची मानसिक स्थिती महत्त्वाची असते. 2011 मध्येही आमच्या दोन खेळाडू फायनलमध्ये होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला उद्या बळ मिळेल असे वाटत नाही. आम्हाला उद्या फक्त आमचं नियमित क्रिकेट खेळायचं आहे आणि बाकी सर्व आमच्या कामगिरीवर अवलंबून असेल.”

हेही वाचा – ICC WC 2023 Final: अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? जाणून घ्या

खेळपट्टीबाबत रोहित काय म्हणाला?

अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत रोहित म्हणाला की, “या खेळपट्टीवर काही गवत आहे म्हणजे ती संथ असेल. त्यामुळे उद्या पुन्हा खेळपट्टी पाहणी करणार, त्यात फारसा बदल झालेला नसेल. कारण याठिकाणी हवामान थोडे थंड झाले आहे, त्यामुळे आम्हाला माहीत नाही की, इथे किती दव असेल. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भरपूर दव पडले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नाणेफेकीला महत्त्व नसेल. उद्या संघाला चांगला खेळ करावा लागेल. तुम्ही उद्या किती चांगला खेळ करता हे सामन्यात सर्वात महत्त्वाची पाहण्यासारखी गोष्ट असेल.”

रोहित आणि विराटसाठी खास योजना

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद करण्याची त्यांची खास योजना आहे. मात्र, यावेळी त्याने शमीपासून दूर राहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. कमिन्स म्हणाला की, “खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे. ही खेळपट्टी याआधीही स्पर्धेत वापरली गेली आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

हेही वाचा – ICC WC 2023: विश्वचषकाची अंतिम फेरी भारत-ऑस्ट्रेलिया; 2003 चा वचपा काढणार का?

भारतीय संघाला एकतर्फी पाठिंबा मिळणार

अहमदाबादमध्ये भारतीय संघाला प्रचंड पाठिंबा मिळतो आणि हे विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिसून आले आहे. याबाबत कमिन्स म्हणाला की, “भारत हा खूप चांगला संघ आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात क्रीडा चाहत्यांचा पाठिंबा साहजिकच एकतर्फी (भारताच्या समर्थनार्थ) असणार आहे. विश्वचषकातील सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे. याबाबत कमिन्स म्हणाला की, “मोठ्या सामन्यांमध्ये आमचे वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या वेळी उभे राहतात. आमच्या संघात दुखापतीची समस्या नसते. खेळाडूंना मोठे सामने खेळण्याचा आणि दबाव सहन करण्याचा अनुभव असतो.

उद्याच्या सामन्यात नाणेफेकीला महत्त्व नाही

विश्वचषक जिंकण्याबाबत विचारले असता कमिन्स म्हणाला की, विश्वचषक जिंकलो तर आमच्यासाठी खूप मोठा विजय असेल. त्यामुळे जर मी प्रतिभावान खेळाडूंसह विश्वचषक ट्रॉफी उचलू शकलो तर मला खूप आनंद होईल.” भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात नाणेफेकीची भूमिका खूप महत्त्वाची होती आणि भारताने नाणेफेक जिंकून सामनाही जिंकला होता. यापार्श्वभूमीवर उद्याच्या सामन्यातील नाणेफेकीबाबत कमिन्स म्हणाले की, नाणेफेक महत्त्वाची नसेल, जेवढी मुंबईमध्ये होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -