घरक्रीडाक्लेअर पोलोसाक बनल्या पहिल्या महिला अंपायर

क्लेअर पोलोसाक बनल्या पहिल्या महिला अंपायर

Subscribe

तिने मेन्स वन डे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून भूमिका बजावली होती. त्यावेळी पोलोकसा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिली महिला पंच बनण्याचा मान पटकला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया आज गुरूवारी मेन्स सामना खेळला जाणार आहे. हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. कारण या सामन्यात एक महिला अंपायरिंग करत आहेत. पहिल्यांदा या सामन्यात एक महिला अंपायर अंपायरिंग करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसका असे महिला अंपायरचे नाव आहे. पोलोसका ही महिला चौथ्या अंपायरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. याआधी तिने मेन्स वन डे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून भूमिका बजावली होती. त्यावेळी पोलोकसा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिली महिला पंच बनण्याचा मान पटकला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलियात एकूण चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत. तिसऱ्या सामन्यात पॉल रिफेल आणि पॉल विल्सन अंपायर म्हणून असणार आहे. ब्रूस ऑक्सनफोर्ड हे तिसरा अंपायर म्हणून काम पाहणार आहे. तर डेव्हिड बून मॅच रेफरी असणार आहेत. त्यानंतर चौथा मंच म्हणून क्लेअर पोलोसाक या अंपायरची जबाबदारी सांभाळणार आहे.

- Advertisement -

३२ वर्षांच्या क्लेअर पोलोसाक यांनी २०१७मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मेन्स क्रिकेटमधील काही सामन्यात त्यांनी अंपायर म्हणून काम केले आहे. ICCच्या कसोटी सामन्याच्या नियमानुसार चौथ्या अंपायरची निवड देशांतर्गत क्रिकेट मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय पॅनलकडून करण्यात येते. इतिहासात पहिल्यांदा कसोटी सामन्यात अंपायर म्हणून महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा – IND vs AUS : हिटमॅन इज बॅक; ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत रोहितचे पुनरागमन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -