Ind vs Aus : ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत भारताची कसोटी मालिकेत २-०ने आघाडी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. विशेष म्हणजे हा सामना भारतीय संघाने तीन दिवसांतच जिंकला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. विशेष म्हणजे हा सामना भारतीय संघाने तीन दिवसांतच जिंकला. फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावा करणे कठीण झाले होते. या दोघांनी अवघ्या दीड तासांत ऑस्ट्रेलियाचे ९ फलंदाज तंबूत पाठवले. (Ind vs Aus Historic win India becomes the first team to retain the BGT for 4th consecutive time India beat Australia in 2nd Test to lead 2 0)

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले. त्यानंतर फलंदाजीवेळी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी चांगली फटकेबाजी करत भारतीय संघाचा विजय पक्का केला. विशेष म्हणजे या विजयानंतर भारतीय संघ कसोटी क्रमवारीत नंबर वन झाला. वन डे, ट्वेंटी-२० व कसोटी एकाच वेळी नंबर वन होणारा हा आशियातील पहिलाच संघ ठरला.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली याने चेतेश्वर पुजारा याच्यासह संघाचा डाव सावरला. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठा पराक्रम केला. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये २५ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. शिवाय, त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला आहे.

विराट कोहलीने ५४९ डावांत हा टप्पा ओलांडला. सचिनला ५७७ डाव खेळावे लागले होते. शिवाय वयाच्या ३४ पर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्याने रिकी पाँटिंगचा २४१९३ धावांचा विक्रम मोडला.

दरम्यान, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन भारताने बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे राखली आहे. भारताने सलग चौथ्यांदा ही ट्रॉफी स्वतःकडे राहून इतिहास घडवला. पुजारा ३१ आणि भरत २३ धावांवर नाबाद राहिले.


हेही वाचा – कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाचा मोठा विक्रम, कपिल देवसह दिग्गज क्रिकेटपटूंना टाकलं मागे