घरक्रीडाIND vs AUS : धोनीकडून खूप काही शिकलो ! - रिषभ पंत

IND vs AUS : धोनीकडून खूप काही शिकलो ! – रिषभ पंत

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतासाठी एका कसोटीत सर्वाधिक झेप पकडण्याचा विक्रम रिषभ पंतने आपल्या नावावर केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने विक्रमला गवसणी घातली. त्याने या सामन्यात ११ झेल पकडले. त्यामुळे भारतासाठी एका कसोटीत सर्वाधिक झेप पकडण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. तसेच ११ झेल पकडत पंतने एका कसोटीत सर्वाधिक झेल पकडण्याच्या जॅक रसेल आणि एबी डी विलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने हा विक्रम केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीकडून मी खूप काही शिकलो असे म्हटले.

मैदानावर शांत कसे राहायचे ते धोनीकडून शिकलो  

पंत म्हणाला, “सामना सुरु असताना मी विक्रमाचा अजिबातच विचार करत नव्हतो. माझे लक्ष फक्त सामन्यावर होते. या सामन्यात आमच्यावर खूप दडपण होते. पण आम्ही हा सामना जिंकल्याचा मला आनंद आहे. या सामन्यात होती तशी दडपणाची परिस्थिती असताना मैदानावर शांत कसे राहायचे ते धोनीकडून मी शिकलो आहे. धोनी हा देशाचा हिरो आहे. त्याच्याकडून मी खेळाडू आणि माणूस म्हणून खूप काही शिकलो आहे. तो जेव्हा आजूबाजूला असतो तेव्हा माझा आत्मविश्वास वाढतो. जर मला काहीही अडचण असेल तर मी त्याच्याकडे जाऊन त्याबाबत चर्चा करू शकतो आणि तो मला त्यावर लगेच उपायही सांगतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -