घरक्रीडाINDw vs AUSw : गुलाबी चेंडू कसोटी सामना अनिर्णित, ऑस्ट्रेलिया आघाडीवर

INDw vs AUSw : गुलाबी चेंडू कसोटी सामना अनिर्णित, ऑस्ट्रेलिया आघाडीवर

Subscribe

स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्कार

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये क्वींसलैंडच्या कैरारा ओवल मैदानावर खेळवण्यात आलेल्या एकमेव गुलाबी चेंडू कसोटी सामना अनिर्णत झाला आहे. या सामन्यात पहिल्यांदा भारतीय खेळाडूंनी फलंदाजी केली होती. भारताने ८ बाद ३७७ धावा पहिल्या सत्रात केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या सत्रात ९ बाद २४१ धावा करुन पहिले सत्र घोषित केले होते. पहिल्या सत्राच्या आधारावर भारताकडे १३६ धावांची आघाडी होती. पाऊस पडल्यामुळे या सामन्यात १०० षटकार होऊ शकले नाही. शेवटच्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला ३२ षटकांमध्ये २७२ धावांचे आव्हान दिले होते. परंतु ऑस्ट्रेलियानं १५ षटक २ बाद ३२ धावा केल्या यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हात मिळवून सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेतला आहे.

गुलाबी चेंडू कसोटी सामना अनिर्णित करण्यात आला आहे. तर भारतीय क्रिकेटपटू आणि फलंदाज स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना अनिर्णित खेळल्यामुळे दोन्ही संघांना २-२ पॉइंट मिळाले असून ऑस्ट्रेलियाकडे ६ तर भारताकडे ४ अंक आहेत. दोन्ही संघांना ३ सामन्यांची टी-२० सीरीज खेळायची आहे. यानंतरच या सीरीजचा विजेता कोण असेल याची घोषणा होईल.

- Advertisement -

स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्कार

गुलाबी चेंडू कसोटी सामन्याच्या पहिल्या डाव्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी घेतली. फलंदाजीमध्ये पहिल्या डावात भारताने ६ बाद ३७७ धावा केल्या होत्या. स्मृतीने उत्कृष्टी खेळी करत २२ चौकार आणि एक षटकार १२७ धावा काढल्या. तसेच दीप्ती शर्मानेही चांगली कामगिरी करत अर्धशतक केले. तर भारताच्या स्टार गोलंदाज झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकार यांच्या वेगवान गोलंदाजीपुढं कांगारुंना तग धरता आला नाही. स्मृती मंधानाच्या उत्कृष्ठ खेळीसाठी तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  मर्यादित षटकांच्या प्रकारात धोनी महान कर्णधार, रवी शास्त्रींनी केलं धोनीचे कौतुक


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -