नवी दिल्ली : आशिया चषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय मालिका खेळायची आहे. 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने संघ व्यवस्थापन आणि निवड समिती भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. (India vs Austrelia Indian squad announced today for series against Australia veteran players get break)
हेही वाचा – सामनावीर ठरलेल्या सिराजने केले ‘असे’ काही की, जिंकली सगळ्यांची मने; वाचा- काय केले त्याने?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आज रात्री 8.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करणार आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघाला 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन आणि निवड समिती मोठ्या स्पर्धेच्या दृष्टीने दिग्गज खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश होऊ शकतो. विश्वचषक स्पर्धेआधी दिग्गज खेळाडूंवर ताण पडू नये यासाठी संघ व्यवस्थापन आणि निवड समिती त्यांना विश्रांती देऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विराट आणि रोहितला शर्माला विश्रांतीची गरज
विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा बर्याच काळापासून क्रिकेट खेळत आहेत. एकदिवसीय विश्वचषकातही अनेक सामने खेळायचे आहेत, त्यामुळे या दोघांना विश्रांती देणे आवश्यक आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज बुमराह नुकताच दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषकाच्यादृष्टीने तो पुन्हा जखमी होणे भारतीय संघाच्या पथ्यावर पडणारे नाही. त्यामुळे त्यालासुद्धा विश्रांती देणे गरजेचे आहे.
हेही वाचा – Parliament Special Session : प्रबळ विरोधकांना ईडीमार्फत कमकुवत करण्याचा प्रयत्न; सरकारवर आरोप
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी इशान किशनला मिळणार संधी?
28 सप्टेंबरपर्यंत एकदिवसीय विश्वचषक संघात बदल केले जाऊ शकतात, अशा परिस्थितीत भारतीय संघाकडे एकदिवसीय विश्वचषकाआधी कोणताही प्रयोग करायचा असेल तर ते ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेत दिग्गज खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. अशापरिस्थितीत रोहित शर्माला विश्रांती दिल्यास त्याच्या जागी इशान किशनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते. केएल राहुललही नुकताच दुखापतीतून सावरल्यानंतर चांगली कामगिरी करत आहे. पण सध्या श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तो तंदुरुस्त असेल तरच त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघाने रविवारी (17 सप्टेंबर) घोषणा केली आहे. पॅट कमिन्सकडे कर्णधारपद कायम असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत फलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लॅबुशेनचा भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. पॅट कमिन्स (कर्णधार), sean abbott, alex carey, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, adam zampa भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा असा 18 सदस्यीय संघ आहे.