IND vs AUS T20 Series: डेव्हिड वॉर्नर गुरुवारपासून (23 नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया T-20 मालिकेत दिसणार नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी या मालिकेतून आपली नावं मागे घेतली आहेत. विश्वचषक विजयानंतर त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. आता ते लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.( IND vs AUS legends will not play the T20 series against India David Warner Pat Cummins Josh Hazlewood Cameron Green Mitchell Marsh Mitchell Starc)
समोर आलेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय वॉर्नर या मालिकेत न खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. त्याच्याशिवाय विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अपष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्क हेही भारताविरुद्धची टी-20 मालिका खेळणार नाहीत.
डेव्हिड वॉर्नर पुढील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. ही मालिका त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका आहे. यानंतर तो क्रिकेटच्या या प्रदीर्घ फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या मालिकेसाठी चांगली तयारी करण्यासाठी त्याला भारतात होणाऱ्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वॉर्नर वनडे आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे.
हे पाच खेळाडूही मायदेशी परतणार
डेव्हिड वॉर्नर आता ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक 2023 संघातील खेळाडूंमध्ये सामील झाला आहे, जे खेळाडू चॅम्पियन बनल्यानंतर आपल्या मायदेशी परतत आहेत. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, कॅमरून ग्रीन आणि मिचेल मार्श हे भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग नाहीत.
अॅरॉन हार्डीची एंट्री
डेव्हिड वॉर्नरच्या जागी अॅरॉन हार्डीला भारताविरुद्द खेळण्यासाठी पाठवण्याची तयारी ऑस्ट्रेलियाने केली आहे. या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, कांगारू संघाला वॉर्नरची उणीव नक्कीच भासेल. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा (535) करणारा फलंदाज होता.
ऑस्ट्रेलियाचा संघ: मॅथ्यू वेड (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, जोस इंग्लिस, अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, केन रिचर्डसन, अॅडम. झंपा, तनवीर संघा.
(हेही वाचा: Kapil Dev : विश्वचषक सामन्याचे आमंत्रण नाही, पण पराभवानंतर कपिल देव यांचा भारतीय संघाला पाठिंबा )