नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट संघ आता T20 मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. टीम इंडिया 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी कांगारूंचे यजमानपद भूषवत आहे. ही मालिका 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल, तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची कमान अनुभवी यष्टिरक्षक मॅथ्यू वेडकडे आहे. यापूर्वी, आयसीसी विश्वचषक 2023 चे सामने स्टार स्पोर्ट्सवर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जात होते आणि डिस्ने हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवले जात होते, परंतु भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणार्या T20 मालिकेतील सामन्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला चॅनल बदलावा लागेल. (IND vs AUS Live streaming of India vs Australia T 20 series can be watched here)
स्पोर्ट्स 18 चॅनलवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. तसंच तुम्ही जिओ सिनेमा अॅपवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
भारतीय निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND v AUS) जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात विश्वचषकात समाविष्ट असलेल्या 4 खेळाडूंना T20 मालिकेसाठी जागा निश्चित करण्यात यश आले आहे. ऋतुराज गायकवाडला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. श्रेयस अय्यरला पहिल्या तीन सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे. शेवटच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस उपकर्णधार म्हणून संघात परतणार आहे. जितेश शर्मा आणि युझवेंद्र चहलच्या रूपाने भारतीय संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.
(हेही वाचा: ‘BOSS असावा तर असा’; विश्वचषकातील भारताच्या पराभवातून सावरण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी )