घरक्रीडाIND vs Aus : अश्विन-जडेजाच्या फिरकीची कमाल; भारताचा 132 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय

IND vs Aus : अश्विन-जडेजाच्या फिरकीची कमाल; भारताचा 132 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १३२ धावांनी ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला. भारताने नागपूर कसोटीत १ डाव आणि १३२ धावांनी असा मोठा विजय मिळवला. पहिल्या डावात १७७ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१ धावांवर संपुष्ठात आला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १३२ धावांनी ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला. भारताने नागपूर कसोटीत १ डाव आणि १३२ धावांनी असा मोठा विजय मिळवला. पहिल्या डावात १७७ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१ धावांवर संपुष्ठात आला. विशेष म्हणजे नागपूर कसोटीत पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माच्या शतकी आणि रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ४०० धावा केल्या होत्या. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत १-० अशी आघाडी देखील घेतली आहे.

या कसोटी सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. भारतीय फिरकीच्या समोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फलंदाजी करण कठीण झाले. अश्विनने सलामीवीर उस्मान ख्वाजाला ५ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि वॉर्नर यांनी १९ धावा केल्या. अश्विनने वॉर्नरलाही बाद केले. दरम्यान या सामन्यात स्टीव्ह स्मिथने सावध फलंदाजी केली. पण सतत विकेट पडत होत्या. त्यामुळे जडेजाने कर्णधार पॅट कमिंन्सला बाद करून ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. तसेच, मोहम्मद शमीने अखेरची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला.

- Advertisement -

स्टीव्ह स्मिथ २५ धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या डावात भारताकडून अश्विनने सर्वाधिक ५, जडेजा आणि शमी यांनी प्रत्येकी २ तर अक्षरने एक विकेट घेतली. पहिल्या डावात ५ विकेट आणि ७० धावा करणाऱ्या जडेजाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, कसोटीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची ही दुसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या आहे. याआधी १९८१ साली मेलबर्न मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ८१ धावांवर ऑलआउट केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs AUS: सामन्यादरम्यान जडेजा आणि सिराजची नवी खेळी, ऑस्ट्रेलियाचा गंभीर आरोप; व्हिडीओ व्हायरल…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -