Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND vs AUS ODI 2023 : भारतीय संघाची झाली घोषणा; फिरकीपटू अश्विनचे...

IND vs AUS ODI 2023 : भारतीय संघाची झाली घोषणा; फिरकीपटू अश्विनचे ​​पुनरागमन

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेगळा संघ निवडला आहे,

नवी दिल्ली : आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघातील एकदिवशीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झाले आहे. (IND vs AUS ODI 2023 Indian squad announced Spinner Ashwins comeback)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेगळा संघ निवडला आहे, तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडलेल्या संघात विश्वचषक संघात असलेल्या खेळाडूंनाच संधी देण्यात आली आहे. मात्र, रविचंद्रन अश्विन तीनही एकदिवसीय सामन्यांसाठी संघाचा भाग आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर तो वनडे संघात परतला आहे. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. जून 2017 मध्ये भारतीय एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर अश्विनने गेल्या सहा वर्षांत केवळ दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. अक्षर पटेल तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात आहे, पण त्याच्या फिटनेसवर संशय आहे. जर तो तंदुरुस्त नसेल तर अश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदरला विश्वचषक संघात संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये लोकेश राहुल (कर्णधार) शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर असा संघ असणार आहे. तर तिसऱ्या सामन्यासाठी रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव, अक्षर पटेल , रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर असा संघ असणार आहे.

हेही वाचा : BJP AIADMK TENSION : अण्णा द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्याचे भाजपसोबतच्या युतीबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले…

विश्वचषकाच्या दृष्टीने महत्वाची मालिका

- Advertisement -

एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत दोन्ही संघांना विश्वचषकाच्या तयारीला अंतिम स्वरूप द्यायचे आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. तर दुसरा सामना 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये आणि तिसरा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये होणार आहे. यानंतर हे दोन्ही संघ 8 ऑक्टोबरला विश्वचषकातही आमने-सामने येणार आहेत.

हेही वाचा : IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा; दिग्गज खेळाडूंना मिळणार विश्रांती?

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा यांचा या संघात समावेश आहे.

- Advertisment -