घरक्रीडाIND vs AUS : विराट गप्प बसला तर आश्चर्यच ! -  पॅट कमिन्स

IND vs AUS : विराट गप्प बसला तर आश्चर्यच ! –  पॅट कमिन्स

Subscribe

विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्याला निघण्यापूर्वी मी आता प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हुज्जत घालणार नाही असे विधान केले होते.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्याला निघण्यापूर्वी मी आता प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हुज्जत घालणार नाही असे विधान केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा विराटच्या या विधानावर विश्वास नाही. विराट जर गप्प बसला तर मला आश्चर्यच वाटेल असे पॅट कमिन्स म्हणाला.

विराटला प्रतिस्पर्धी खेळाडूंशी पंगा घ्यायला आवडतो

विराटच्या विधानाबाबत कमिन्स म्हणाला, “मी विराट काय म्हणाला हे ऐकले. पण विराट जर गप्प बसला तर मला आश्चर्यच होईल. तो मैदानात खूप आक्रमक असतो. त्याला प्रतिस्पर्धी खेळाडूंशी पंगा घ्यायला आवडतो. त्यामुळे त्याचा खेळ अधिकच घातक होतो. पण विराटने जर आमच्याशी पंगा घ्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही त्याच्याबरोबर शाब्दीक वादावादी झाली तर त्यासाठी तयार आहोत. आम्ही विराटला इतर खेळाडूंपेक्षा वेगळी वागणूक देणार नाही. मला वाटते की ही मालिका खूपच उत्कंठावर्धक होईल. या मालिकेत दोन्ही संघ खूप चांगले प्रदर्शन करतील. पण काही वर्षांपूर्वी भारतात झालेल्या मालिकेत ज्याप्रमाणे तणाव निर्माण झाला होता तसा यावेळी होणार नाही अशी मला आशा आहे.”

दोन संघांत तणाव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांत दोन्ही संघांतील खेळाडू नेहमीच आक्रमकपणा दाखवतात. पण मागील वर्षी बंगळूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात तेव्हाचा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ पायचीत झाल्यानंतर त्याने रीव्यूव्ह घेण्याआधी ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूमकडे बघितले, जे भारतीय संघाला फारसे आवडले नाही. त्यामुळे दोन संघांत तणाव निर्माण झाला होता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -