घरक्रीडाIND VS AUS : परीक्षेत ३६ मार्क मिळवले म्हणजे जग संपत नाही...

IND VS AUS : परीक्षेत ३६ मार्क मिळवले म्हणजे जग संपत नाही – सचिन तेंडुलकर

Subscribe

परीक्षेत ३६ मार्क मिळाले म्हणजे जग तुमच्यासाठी संपल अस समजू नका. तुम्हाला हा आकडा फक्त पुढे जाण्यासाठीची जिद्द देत असतो. एकदा तुम्हाला यश मिळाल की कधीच त्यांना विसरू नका जे तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी उभे राहिले. जेव्हा तुम्हाला इतरांनी नाकारले तेव्हा ज्यांनी साथ दिली अशा लोकांसोबत तुमचा आनंद सेलिब्रेट करा. अॅडलेडच्या ३६ ऑल आऊटच्या सुमार कामगिरीनंतर भारताने मालिका जिंकल्यावर ही प्रतिक्रिया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी दिली आहे. भारतीय संघाच्या शेवटच्या कसोटीतील कामगिरीनंतर सचिनने हा सल्ला आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून दिला आहे. सचिनचे हे ट्विट अनेकांनी शेअर केले आहे. तर अनेकांनी या ट्विटला लाईक करत आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. भारतातील तसेच जगभरातील चाहत्यांसाठी सचिनने आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिलेला हा संदेश अत्यंत प्रेरणादाई असा आहे.

- Advertisement -

आपल्या सगळ्यांसाठी भारतात आणि संपुर्ण जगभरातील चाहत्यांना उद्देशून ट्विट करताना सचिन म्हणतो, तुम्ही आयुष्यात एखाद्या परीक्षेत ३६ किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळवता म्हणजे हा जगाचा अंत नसतो. तुम्हाला हा आकडा पुढे जाण्यासाठी नेहमीच चालना देत असतो. म्हणूनच ३६ हा फक्त आकडा आहे. त्यामधून खचून जाऊ नका. या आकड्यानंतरही जग आहे. त्यामुळे या आकड्याला पाहतच तुमची पुढची कामगिरी चांगली करा असा सल्ला सचिनने दिला आहे. तुमच्या अशा कठीण काळात तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी उभा राहणाऱ्यांना विसरू नका. तुमच्या आय़ुष्यातील अशी सुमार कामगिरीनंतर जे तुम्हाला पाठिंबा आणि साथ देतात त्यांना विसरू नका. जेव्हा पुढे जाऊन तुम्ही यश मिळवता तेव्हा अशा पाठिशी उभा राहणाऱ्या व्यक्तींसोबत आपला आनंद साजरा करा असा सल्ला सचिनने दिला आहे. सचिनच्या या ट्विटवर सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यामध्ये अनेकांनी सचिनच्या ट्विटचे समर्थन केले आहे. तर अनेक जणांनी या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -