Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाIND vs AUS Semis : सामना बरोबरीत राहिल्यास सुपर ओव्हर होणार की नाही? ICC चा तो नियम चर्चेत

IND vs AUS Semis : सामना बरोबरीत राहिल्यास सुपर ओव्हर होणार की नाही? ICC चा तो नियम चर्चेत

Subscribe

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया हे पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत एकमेकांसमोर आले आहेत. अशामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोण विजयी होणार? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. पण, समजा हा सामना बरोबरीत निघाला तर काय होणार? सुपर ओव्हर होणार का? याकडे याबद्दल अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच, भारतीय संघ हा 2023 मधील एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढणार का? याकडेदेखील साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (IND vs AUS Semi Final What happens if Semi Final ends in tie ICC gaidelines)

हेही वाचा : Champions Trophy : पुन्हा आयसीसीच्या उपांत्य फेरीत तेच संघ, चॅम्पियन्स ट्रॉफीतील हा योगायोग काय? 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीमध्ये निकाल निघावा यासाठी आयसीसीने याआधीच एक दिवस राखीव ठेवला आहे. पावसाच्या व्यत्ययाने किंवा इतर कोणत्याही कारणाने मंगळवारचा सामना झाला नाही तरीही तो बुधवारी घेण्यात येऊ शकतो. साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना समान गुण दिले गेले आहेत. पण हा बाद फेरीचा सामना आहे आणि त्यामुळे नियम वेगळे आहेत. जर हा सामना बरोबरीत सुटला तर सर्वात आधी सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. तसेच, जर सुपर ओव्हरही बरोबरीत निघाली तर गट साखळी फेरीत ज्या संघाचे सर्वाधिक गुण असतील तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल, असे आयसीसीचे नियम सांगतात. त्यामुळे भारतीय संघाचे सर्वाधिक शक्यता अंतिम फेरीत जाण्याची आहे.

साखळी सामन्यात भारतीय संघ अव्वल

भारतीय संघांचे रोहित शर्माच्या नेतृत्वात साखळी सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. संघाने सलग तीन सामन्यांत एकहाती विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या नावावर 6 गुण जमा असून अव्वल स्थानावर आहे. तेच दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलियाला एकच विजय मिळवता आला आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन सामने पावसामुळे रद्द झाल्याने प्रत्येकी एक एक गुण देण्यात आले. तर पहिल्याच सामन्यात विजय मिळवल्यानंतर ब गटात ऑस्ट्रेलियाच्या नावावर फक्त 4 गुण आहेत.

दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड सामन्यासाठीही राखीव दिवस

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांमध्ये खेळला जाणार आहे. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यासाठी 6 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर या सामन्याचाही निकाल लागला नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. खरंतर, दक्षिण आफ्रिका ग्रुप बी मध्ये अव्वल स्थानावर होता. तर न्यूझीलंडने अ गटात दुसरे स्थान पटकावले होते.