Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाIND vs AUS : 2023च्या पराभवाचा वचपा काढला, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर विजय अन् फायनलचे तिकीट

IND vs AUS : 2023च्या पराभवाचा वचपा काढला, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर विजय अन् फायनलचे तिकीट

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. तसेच, त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकून 2023 च्या विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला आहे. उपांत्य फेरीमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रलियाविरुद्ध 4 विकेट्सनी विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करता ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे भारतीय संघाने अवघ्या … षटकांमध्ये पार पाडले. यावेळी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने महत्त्वपूर्ण योगदान देत 84 धावांची खेळी केली. तसेच, केएल आणि हार्दिक पांड्याच्या खेळीमुळे संघाचा विजय सोप्पा झाला. (IND vs AUS team india won against Australia in Semis entered into final)

हेही वाचा : IND VS AUS : भारताचा पराभव होणार? दुबईत 250+ धावांचा फक्त तीनदा पाठलाग 

265 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय संघाने शुभमन गिलच्या स्वरुपात पहिला विकेट 30 धावांवर गेला. यावेळी त्याने 8 धावा केल्या. यानंतर कर्णधार रोहित शर्माही 28 धावांवर एक खराब शॉट खेळून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची अमूल्य भागीदारी रचली. पण, यावेळी कोहलीने 53 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक साजरे केले. पण, श्रेयस अय्यर मात्र 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलनेही 27 धावा आणि हार्दिक पांड्याने झटपट 28 धावांचे योगदान दिले. यावेळी के.एल. राहुलने नाबाद 42 धावा करत भारताला एक षटकार मारत विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली नाही. तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने कूपर कॉनोलीला शून्यावर बाद करत मोठा झटका दिला. पण सलामीला आलेल्या ट्रेव्हीस हेड आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने सावध खेळी केली. पण, वरुण चक्रवर्तीने हेडला 39 धावांवर बाद करत भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशा पल्लवित केल्या. पण त्यानंतर कर्णधार स्मिथने मार्नस लाबुशेनच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, जडेजाच्या फिरकीसमोर लाबुशेन 29 धावांवर पायचीत झाला. त्यानंतर जोश इंग्लिसला 11 धावांवर बाद केल्यानंतर शमीने कर्णधार स्मिथला 73 धावांवर बाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ हा 198 धावांवर तंबूत परतला होता. त्यानंतर आलेल्या अ‍ॅलेक्स कॅरीने 61 धावा करत एक बाजू सांभाळून ठेवली पण त्याच्यासोबत एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजीसमोर तग धरता आला नाही. संपूर्ण संघ 264 वर सर्वबाद झाला. यावेळी मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर, वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2 तर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेत महत्त्वपूर्व योगदान दिले.