घरक्रीडाInd vs Aus: गाबा कसोटी विजयाचं पॉलिटिकल कनेक्शन; भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव

Ind vs Aus: गाबा कसोटी विजयाचं पॉलिटिकल कनेक्शन; भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव

Subscribe

भारताने ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि निर्णायक कसोटीत पराभव करत मालिका २-१ अशी खिशात घातली. या विजयासह बॉर्ड-गावस्कर ट्रॉफी स्वत:कडे राखण्यात यश मिळवलं. शिवाय, ऑस्ट्रेलियाला गाबा मैदानावर भारताने पराभूत केलं. गेल्या ३२ वर्षात ऑस्ट्रेलिया गाबा मैदानावर कोणत्याच संघाकडून पराभूत झाला नाही. ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका भारताने पराभूत करत खंडित केली. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजकीय नेत्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. मोदींनी ट्विट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. “भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाने आम्हाला अत्यानंद झाला आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय खेळाडुंमधील उर्जा आणि उमेद प्रकर्षाने दिसून आली. भारतीय खेळाडुंनी दाखविलेला दृढनिश्चय, धैर्य आणि त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी होती. भारतीय संघाचे अभिनंदन, भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा,” असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार ट्विट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. “गाबा खेळपट्टीवर ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला,” असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने देखील भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.


हेही वाचा – Ind vs Aus: ‘अजिंक्य’ भारताने कांगारुंना लोळवलं; मालिका २-१ ने खिशात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -