Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाIND vs AUS Test : यशस्वी जैस्वालची कामगिरी अन् केले हे विक्रम;...

IND vs AUS Test : यशस्वी जैस्वालची कामगिरी अन् केले हे विक्रम; वाचा सविस्तर

Subscribe

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 – 2025 मध्ये स्थान पक्के करण्यासाठी भारतीय संघाला चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. अशामध्ये आता बॉर्डर - गावस्कर मालिकेत भारतीय संघ मजबूत स्थितीत आली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पहिला कसोटी सामना पर्थमध्ये सुरू आहे. बॉर्डर – गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटीत पहिल्या सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. यामध्ये भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वालच्या खेळीचा मोठा वाटा आहे. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाजांनी दुसर्‍या डावामध्ये चांगली कामगिरी केली. यावेळी सलामीला उतरलेल्या यशस्वी जैस्वालने दुसर्‍या डावात 161 धावा केल्या. यावेळी संघाने 400 हून अधिक धावा केल्या आहेत. (IND vs AUS Test yashasvi Jaiswal create new record in WTC 2023 – 25)

हेही वाचा : IPL Auction 2025 : किती वाजता सुरू होणार मेगा लिलाव? या ठिकाणी पाहता येणार… 

- Advertisement -

पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या यशस्वी जैस्वालने दुसर्‍या डावात दीड शतक केले. त्याच्या के.एल. राहुलच्या 201 धावांच्या सलामी भागीदारीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला. दरम्यान, जैस्वालने झळकावलेल्या शतकामुळे WTC 2023-25 मध्ये एक नवा विक्रम केला आहे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 – 2025 मध्ये चौथे शतक झळकावले. या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर पोहोचला. या यादीत जयस्वालने शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले. याआधी शुभमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनीही प्रत्येकी तीन शतके झळकावली.

यशस्वी जैस्वालने या सामन्यात 297 चेंडूत 161 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 15 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला मोठी आघाडी मिळाली. या शतकासोबत तो ऑस्ट्रेलियातील युवा भारतीय शतकवीरांच्या यादीत स्थान पटकावले आहे. तो या यादीत 1992 मध्ये सचिन तेंडुलकरने (18 वर्ष 253 दिवस) शतक झळकावले. तर, 2019 मध्ये ऋषभ पंतने (21 वर्ष 91 दिवस) ही कामगिरी केली होती. 1948 मध्ये दत्त फडकर (22 वर्ष 42 दिवस) हेदेखील ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारे सर्वात युवा खेळाडू ठरले होते. त्यानंतर चौथ्या क्रमाकांवर 22 वर्ष 330 दिवशी शतक झळकावत या यादीत स्थान मिळवले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -