दौरा सुरू असताना या खेळाडूंच्या वडिलांचं निधन; माघारी न फिरता भरल्या डोळ्यांनी खेळले 

या खेळाडूंनी वडिलांच्या निधनाचं दुःख मनात ठेवून कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

Ind vs aus The fathers of these players passed away while the tour was going on
दौरा सुरू असताना या खेळाडूंच्या वडिलांचं निधन

भारताने ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात पराभूत करत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरलं. याशिवाय, ऑस्ट्रेलियाला गाब्बाच्या मैदानावर ३२ वर्षांनी हरवत भारताने इतिहास रचला. बाजाराच्या ऐतिहासिक विजयात भारताचा युवा जलदगतीचा गोलंदाज मोहम्मद सिराजचा महत्त्वाचा वाटा आहे. संपूर्ण मालिकेत सिराजने चांगली कामगिरी केली. मात्र, सिराजसाठी ही मालिका जेवढी आनंद देणारी ठरली असली तरी तेवढीच दुःखद ठरली. कसोटी मालिका सुरू व्हायच्या दोन-तीन दिवस आधी सिराजच्या वडिलांचं निधन झालं.

मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचं २० नोव्हेंबरला निधन झालं. गौस हे ५३ वर्षांचे होते आणि त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार झाला होता. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिराजच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. शिवाय, मुलाला कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याचं त्याच्या वडिलांचं स्वप्न अधुरं राहिलं. वडिलांच्या निधनाचं दुःख मनात ठेवून कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

सचिन तेंडुलकर

२३ मे १९९९ हा दिवस सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील खास दिवस आहे. हे सचिनच्या आयुष्यातील लक्षात राहण्याजोगे शतक आहे. या शतकानंतर सचिनच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. सचिनने हे शतक आपल्या वडिलांना समर्पित केले होते. सचिनच्या या खेळीने संपूर्ण देशाने त्याला सलाम ठोकला होता. स्टेडियममध्ये लोक पोस्टर आणि बॅनर घेऊन आले होते यात सचिन हम तुम्हारे साथ हैं सचिन… भारत तुम्हारे साथ है सचिन… असं म्हटलं होतं.

शतक झळकवायच्या आधी सचिनच्या वडिलांचं १९ मे १९९९ रोजी निधन झालं होतं. त्यानंतर सचिन अंत्यसंस्कार करण्यासाठी भारतात आला होता. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर सचिन लगेचच इंग्लंडला रवाना झाला.

विराट कोहली

विराट कोहली १८ वर्षांचा असताना त्याचे वडील प्रेम कोहली यांचं निधन झालं. २०१६ मध्ये १८ वर्षीय विराट रणजी करंडक स्पर्धेत दिल्ली संघातर्फे कर्नाटकविरुद्धची मॅच खेळत होता. या मॅचदरम्यान कोहलीच्या वडिलांचं निधन झालं. कोहली मॅच सोडून जाणं साहजिक होतं. मात्र तू खेळून मोठं व्हावंस हे तुझ्या वडिलांचं स्वप्न होतं. त्यामुळे तू खेळणं अर्धवट सोडू नकोस असं त्याच्या प्रशिक्षकांनी समजावलं.

अंत्यसंस्कार विधी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराट मॅच खेळण्यासाठी परतला आणि त्याने ९० धावांची खेळी साकारली. अशा कठीण प्रसंगीही कर्तव्याला प्रमाण मानल्याबद्दल त्यावेळी प्रतिस्पर्धी कर्णधारानं त्याला आलिंगन दिल्याचा फोटो त्यावेळी प्रसिद्ध झाला होता.

मनदीप सिंग

किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघातील मनदीप सिंगच्या वडिलांचे २४ ऑक्टोबर २०२०ला निधन झालं. पण वडिलांच्या निधनानंतरही मनदीप आयपीएलचा सामना खेळला. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरही मनदीपने ही गोष्ट आपल्या देहबोलीतून दाखवली नाही. वडिलांच्या निधनानंतरही मनदीप आपलं कर्तव्य विसरला नसल्याचं पाहायला मिळालं.


हेही वाचा – BCCIकडून इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंनी केले कमबॅक