घरक्रीडाIND Vs AUS U19 : ऑस्ट्रेलियनच पुन्हा जगज्जेते; अंतिम सामन्यात भारताचा पराभव

IND Vs AUS U19 : ऑस्ट्रेलियनच पुन्हा जगज्जेते; अंतिम सामन्यात भारताचा पराभव

Subscribe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 253 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत 174 धावांवर गारद झाला.

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनल आणि एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये वरिष्ठ स्तरावर भारताचा पराभव केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने आता कनिष्ठ स्तरावर देखील भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा केला. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यांनी टीम इंडियाचा 79 धावांनी पराभव केला. (IND Vs AUS U19 Australians again world champions India lost in the final match)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 253 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत 174 धावांवर गारद झाला.

- Advertisement -

कांगारूंनी वर्षभरात तिसऱ्यांदा भारतीय संघाचे स्वप्न भंग केले आहे. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचे हे चौथे विजेतेपद आहे. याआधी त्याने 1988, 2002 आणि 2010 मध्येही विजेतेपद पटकावले होते. ऑस्ट्रेलियाने 14 वर्षांनंतर अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. भारत पाच वेळा चॅम्पियन आहे. त्याने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विजेतेपदावर कब्जा केला होता. यासह ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचा भारताचा इरादाही उधळला. आतापर्यंत केवळ पाकिस्तानलाच सलग दोनदा अंडर-19 विश्वचषक जिंकता आला आहे. 2004 आणि 2006 मध्ये त्याने हे केले होते. पाकिस्तानने 19 वर्षांखालील विश्वचषक देखील दोनदा जिंकला आहे तर इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशने प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा : CM Shinde : गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद आम्हीच संपवला; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने दिलं होतं 254 धावांचं लक्ष

अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारत विरुद्ध 50 षटकात 253 धावा केल्या. भारताला विजेतेपदासाठी 254 धावा कराव्या लागत होत्या. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने सर्वाधिक 55 धावांची खेळी खेळली. तर कर्णधार वेबगेनने 48 धावा केल्या. मात्र, त्याचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही. सलामीला आलेला हॅरी डिक्सनही 42 धावा करून बाद झाला. याशिवाय ऑलिव्हर पीक 46 धावांवर नाबाद राहिला आणि टॉम स्ट्रेकर 8 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले तर नमन तिवारीने 2 बळी घेतले. याशिवाय सौम्या पांडे आणि मुशीर खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -