घरक्रीडाअश्विन आणि उमेश यादवने मोडलं बांगलादेशचं कंबरडं; 227 धावांवर आटोपला पहिला डाव

अश्विन आणि उमेश यादवने मोडलं बांगलादेशचं कंबरडं; 227 धावांवर आटोपला पहिला डाव

Subscribe

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळवला जात आहे. सामन्यात बांगलादेशने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी पहिल्या डावात बांगलादेशने 73.5 षटकांत सर्वबाद 227 धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून आर अश्विन आणि उमेश यादवने गोलंदाजीचा भेदक मारा करत बांगलादेशचा धुव्वा उडवला.

भारताकडून उमेश यादवने 4 तर अश्विनने 4 विकेट्स घेत बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. तब्बल 12 वर्षानंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकटनेही 2 विकेट्स घेतल्या. बांगलादेशकडून मोमिनूल हकने उत्कृष्ट अशी खेळी करत 84 धावा केल्या. तर भारताने दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या. त्याचबरोबर मुशफिकर रहीम 26, लिटन दास 25 आणि शांतोने 24 धावांचे योगदान दिले.

- Advertisement -

चहापानाला खेळ थांबला त्यावेळी बांगलादेशच्या 57 षटकात 5 बाद 184 धावा झाल्या होत्या.त्यानंतर मोमिनूल हकने बांगलादेशला 200 चा टप्पा पार करून दिला. मात्र ब्रेकनंतर उमेश यादवने बांगलादेशला दोन धक्के दिले.

- Advertisement -

हेही वाचा : एकनाथ शिंदेंचं भूखंड प्रकरण बाहेर काढण्यात भाजपचाच हात, संजय राऊतांचा खळबळजनक दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -