IND vs BAN : कुलदीपची जादू चालली; तरीही भारताने Follow On दिला नाही

भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात ४०४ धावसंख्या उभी केली.

भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात ४०४ धावसंख्या उभी केली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक काळ टिकू दिले नाही. या सामन्यात कुलदीपची जादू चालली पण तरीही भारताने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला. (IND vs BAN First Test Kuldeep Yadav scored a 40 and picked up a 5 wicket)

चायनामॅम फिरकीपटू कुलदीप यादव याने कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याच्यासोबतच अक्षर पटेलने अखेरची विकेट घेत बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळला. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ४०४ धावा केल्या. भारताने दिलेल्या ४०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांना चांगली सुरूवात करता आली नाही. बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सलामवीर नजमूल शांतोला यष्टिरक्षक रिषभ पंतने झेलबाद केले. उमेश यादवने बांगलादेशला दुसरा धक्का देत यासिर अलीला (४) त्रिफळाचीत केले. तसेच, जाकीर हसन (२०) व लिटन दास (२४) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु सिराजने त्यांचा डाव हाणून पाडला. कुलदीप यादवनेही पुनरागमनाच्या कसोटीत दमदार फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल केली. त्याने मुश्फीकर रहिम (२८), कर्णधार शाकिब अल हसन (३) आणि नुरूल हसन (१६) यांच्या विकेट्स घेत बांगलादेशला सातवा धक्का दिला.

कुलदीपने १० षटकांत ३३ धावांत ४ विकेट्स घेतल्या. बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १३३ धावा केल्या होत्या. मात्र, कुलदीपने तिसऱ्या दिवशी आणखी एक विकेट घेत डावातील पाच विकेट्स पूर्ण केल्या. इबादत होसैनच्या सुरेख झेल रिषभने टिपला. चट्टोग्राम येथे पाच विकेट्स घेणारा कुलदीप हा पहिला भारतीय ठरला. कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.


हेही वाचा – डोनाल्डचा माफीनामा, तर द्रविडचा मिश्किल अंदाज