दुसऱ्या दिवशी भारतीय संघ २४९ धावांनी आघाडीवर, आर.अश्विनची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाचे सर्वोतपरी प्रयत्न सुरु

IND vs ENG 2nd Test Day 2 india lead with 249 runs ravichandran ashwin take 5 wickets
दुसऱ्या दिवशी भारतीय संघ २४९ धावांनी आघाडीवर, आर.अश्विनची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

भारत विरुद्ध इग्लंड संघात दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या कसोटी समान्यात भारताने दुसऱ्या डावात दिवसाला ५४ धावा १८ षटकात केल्या यामध्ये १ गडी बाद झाला. भारताकडून दुसऱ्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी चांगली खेळी केली आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा ७ धावांवर नाबाद तर रोहित शर्मा २५ धावांवर नाबाद झाला. भारताने दुसऱ्या दिवशी २४९ धावा केल्या आहेत. पहिली कसोटी हारल्यामुळे दुसऱ्या कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघ सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत होता. दुसऱ्या कसोटीच्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिल खेळपट्टीवरील आपली कामगिरी दाखवू शकला नाही. जॅक लिचने शुभमन गिलला १४ धावावंर बाद केले.

दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात आर. अश्विनने आपल्या गोलंदाजीने चांगलीच कामगिरी केली आहे. आर.अश्विनने गोलंदाजीने पहिल्या डावात इंग्लंडला १३४ धावांवर गुंडाळलं. अश्विनने ५ विकेट घेतले आहेत. भारताकडून या डावात सर्वाधिक धावा या रोहित शर्मान केल्या आहेत. रोहित शर्माच्या एकूण १६१ धावा आहेत. तर अजिंक्य राहणेने ६७ धावा, रिषभपंतच्या ५८ धावा आहेत. भारताला दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला शुभमन गील बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला आहे.

शुभमन गिलच्यानंतर रोहित शर्मा आणि पुजाराने भारतीय संघाला उभारी देत चांगली खेळी केली आहे. दुसऱ्या दिवशी २१७ धावा केल्या असून १५ विकेट गेले आहेत यामध्ये भारताचे पहिल्या दिवशी ४ आणि दुसऱ्या दिवशीचा १ असे मिळून ५ विकेट गेले आहेत. तर इग्लंडचे पहिल्या दिवशी एकूण १० विकेट आहेत.