घरक्रीडाIndia vs England Test : दुसऱ्या कसोटीतही भारत पराभूत

India vs England Test : दुसऱ्या कसोटीतही भारत पराभूत

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ टेस्ट मॅचेसच्या मालिकेत पहिली टेस्ट ३१ धावांनी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्येही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडने भारतावर १ डाव आणि १५९ धावांनी विजय मिळवला आहे.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्येही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताला १ डाव आणि १५९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले असून इंग्लंडने या दमदार विजयासह ५ टेस्ट मॅचेसच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्सवर आपली बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीचे  अप्रतिम प्रदर्शन दाखवत सामन्यात विजय मिळवला असून भारताकडून कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

असा झाला सामना

सर्वात आधी भारताने बॅटिंग करत १०७ केल्या त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग करत ७ बाद ३९६ धावांवर डाव घोषित केला. इंग्लंडकडून सर्वाधिक ख्रिस वोक्सने १३७, बेअरस्टोने ९३ धावा केल्या तर सॅम कुरनने ४० धावा करत भारतासमोर २४१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या १३० धावांत आटोपला आणि भारताला तब्बल १५९ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन आश्विन यांची अर्धशतकी भागिदारी सोडली तर दुसऱ्या कोणत्याही बॅट्समनकडून चांगली कामगिरी झालेली नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी अप्रतिम बॉलिंग करत प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या तर ख्रिस वोक्सने दोन विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे जेम्स अँडरसनने लॉर्ड्सवर आपल्या टेस्ट विकेट्सचे शतक पूर्ण करत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

- Advertisement -

ख्रिस वोक्स सामनावीर

इंग्लंडचा अष्टपैलु खेळाडू ख्रिस वोक्सने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही अप्रतिम करत सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला. सर्वात आधी बॅटिंग करत त्याने १७७ बॉल्समध्ये १३७ धावा केल्या ज्यात २१ फोर्सचा समावेश होता. त्यानंतर बॉलिंग करताना १० ओव्हर्समध्ये २४ धावा देत २ विकेट्स आपल्या नावे केल्या. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा खिताब देण्यात आला.

Chris Woakes
ख्रिस वोक्स
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -