घरक्रीडाIND vs ENG 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून दोन खेळाडू बाहेर पडल्यामुळे...

IND vs ENG 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून दोन खेळाडू बाहेर पडल्यामुळे अखेर सरफराजला मिळाली संधी

Subscribe

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने अवघ्या 28 धावांनी जिंकत भारताचा धक्कादायक पराभव केला. मात्र यानंतर भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीसाठी बाहेर पडले आहेत. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच दोन खेळाडूंच्या जागी तीन खेळाडूंची निवड केली आहे. यात युवा फलंदाज सरफराज खानचाही समावेश आहे. (IND vs ENG 2nd Test Sarfraz finally got a chance as two players were out of the 2nd Test)

हेही वाचा – Dean Elgar on Virat Kohli: ‘विराट कोहली माझ्यावर थुंकला’, डीन एल्गरचा आरोप, दोघांमध्ये झाली होती शिवीगाळ

- Advertisement -

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी रविंद्र जडेजा हाताला दुखापतीमुळे तर केएल राहुल क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडले आहेत. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक या दोघांवर लक्ष ठेवून आहे. रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ केला. पहिल्या डावात केएल राहुलने 86, तर जडेजाने 87 धावांची खेळी केली. मात्र दुसऱ्या डावात दोन्ही फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे भारतीय संघाला 28 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, हे दोन्ही फलंदाज आता बाहेर पडल्यामुळे त्यांच्या जागी निवड समितीने तीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. फलंदाज सर्फराज खान, डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराजच्या सर्वाधिक धावा 

सरफराज खान हा गेल्या काही मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. असे असतानाही त्याला इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड समितीकडून वगळण्यात आले होते. सरफराजने 45 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 69.85 च्या सरासरीने 3912 धावा केल्या आहेत. त्याने 14 शतके आणि 11 अर्धशतके केली असून नाबाद 301 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे संघात संधी मिळावी अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. अखेर ही संधी चालून आली आहे. त्यामुळे आता तो मिळालेल्या संधीचे सोने करतो का? हे पाहावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – NCP : शरद पवारांबद्दल असंतोष होता? साक्ष नोंदवताना अनिल पाटील नेमकं काय म्हणले…

सौरभ कुमार अष्टपैलू खेळाडू

30 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार याआधी भारतीय संघाचा भाग होता, परंतु त्याला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. त्याने 68 प्रथम श्रेणी सामन्यात 290 विकेट घेतल्या आहेत. तसेच 64 धावांत 8 विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय त्याने 27.11 च्या सरासरीने 2061 धावा केल्या आहेत. 133 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा अद्ययावत संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिरा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -