Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Ind Vs Eng 5th Test 2021 : म्हणूनच पाचवी टेस्ट रद्द, दादा...

Ind Vs Eng 5th Test 2021 : म्हणूनच पाचवी टेस्ट रद्द, दादा म्हणाला…

Related Story

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर ब्रिटीश माध्यमांनी बीसीसीआयच्या धोरणावर टीका केली होती. पाचवा सामना रद्द होण्यासाठी बीसीसीआयला जबाबदार ठरवत आयपीएल टूर्नामेंटसाठी कसोटी रद्द केल्याची टीकेची झोड ब्रिटीश मिडियाने उडवली होती. कोरोनाचे संकट वाढल्यानेच ही कसोटी रद्द केल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. त्यामुळेच मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने सामना रद्द करण्याएवजी हा सामना नव्या वेळापत्रकानुसार घ्यावा अशीही मागणी केली होती. पण या संपुर्ण प्रकरणावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पहिल्यांदाच अबोला सोडला आहे. (Ind Vs Eng 5th test 2021 BCCI president sourav ganguly first reaction after machester test cancelled)

मॅंचेस्टर येथे आयोजित पाचवा कसोटी सामना हा भारत आणि इंग्लंड या संघादरम्यान खेळला जाणार होता. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना होता. या सिरीजमधील शेवटचा कसोटी साना हा १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार होता. पण सामन्याच्या एक दिवस आधीच भारतीय संघाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे कोरोना संक्रमित आढळले. त्यानंतर सर्व खेळाडूंचा सराव रद्द करतानाच त्यांना हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला दिला गेला. या सर्व खेळाडूंच्या कोरोना चाचणीमध्ये सर्व खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली. पण भीतीच्या वातावरणामुळेच खेळाडूंनी पाचवा सामना खेळण्यापासून मनाई केली.

- Advertisement -

सौरव गांगुलीने एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना स्पष्ट केले की, खेळाडूंनीच सामना खेळण्यासाठी नकार दिला होता. अशावेळी खेळाडूंना दोष देता येत नाही. कारण योगेश परमार हे सर्व खेळाडूंच्या संपर्कात होते. त्यामुळे अशी भीती मनात निर्माण होणे साहजिक होते. परमार हे नेहमीच सर्व खेळाडूंसोबत मनमोकळेपणाने संपर्कात असायचे. तसेच सर्व खेळाडूंना मसाज देण्यासारख्या दिनचर्येचा भागही त्यांच्या वेळापत्रकामध्ये समाविष्ट होता. तसेच परमार यांनीही कोरोनाची चाचणी केली होती.

पण परमार हे नेहमीच संपर्कात असल्याचे सर्व खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण होते. पण कोरोना चाचणीचा निकाल समोर आल्यानंतर परमार हे पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. त्यामुळे सर्व खेळाडूंच्या मनात हीच भीती निर्माण झाली की ते खेळाडूही कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. याचीच भीती खेळाडूंच्या मनात निर्माण झाली. कोरोनाच्या महामारीचे संकट पाहता अनेकांनी या आजाराचा धसका घेतला होती, असेही गांगुली यांनी स्पष्ट केले.


- Advertisement -

हेही वाचा – विराटच्या कर्णधार पदाबाबत BCCI कडून आली पहिली प्रतिक्रिया…


 

- Advertisement -