घरक्रीडाअंतिम कसोटीत बेरस्टोव पुन्हा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत

अंतिम कसोटीत बेरस्टोव पुन्हा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यात अखेरचा कसोटी सामना ७ सप्टेंबर पासून सुरू होणार असून यात इंग्लंडच्या संघात बेरस्टोवला यष्टीरक्षक म्हणून घेण्यात आले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेरस्टोवला दुखापत झाल्यामुळे तो चौथ्या कसोटीत यष्टीरक्षण करू शकला नव्हता मात्र आता तो पूर्णपणे फिट झाल्याने पाचव्या कसोटीत यष्टीरक्षण करणार आहे. इंग्लंडने आधीच मालिकेत ३-१ ची आघाडी घेतली असल्याने पाचवी कसोटी ही केवळ औपचारिक सामना म्हणून खेळवली जाणार आहे. संघात बेरस्टोवला यष्टीरक्षक म्हणून घेण्यात येणार असल्याची घोषणा आयसीसीने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एका ट्विट द्वारे केली आहे.

- Advertisement -

चौथ्या कसोटीत बेरस्टोवच्या जागी बटलर होता यष्टीरक्षक

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक बेरस्टोवला हाताला दुखापत झाली असल्याने चौथ्या सामन्यात त्याच्या जागी जोस बटलरने यष्टीरक्षण केले होते. जोसने सामन्यात दोन्ही डावात ९० धावा केल्या असून १ झेल घेतला होता.

joss butler
जॉस बटलर

पाचव्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य संघ

भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा,हनुमा विहारी, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा,जसप्रीत बुमराह.

- Advertisement -

इंग्लंड – जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कूक, किटन जेनिंग्स, जॉनी बेरस्टोव (यष्टीरक्षक), जोस बटलर (उप-कर्णधार), आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम करन, मोईन अली,बेन स्टोक्स.

 

वाचा – पाचव्या टेस्टसाठी विहारी, जडेजाला संधी मिळण्याची शक्यता

 

अशी गमावली भारताने मालिका 

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने ३१ धावांनी विजय मिळवला त्या पाठोपाठ दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडने तब्बल १५९ धावांनी विजय मिळवल्यानंतर इंग्लंड मालिका जिंकतो असे वाटत असताना भारताने मालिकेत कमबॅक करत तिसरी कसोटी तब्बल २०३ धावांनी जिंकली. मात्र चौथ्या कसोटीत भारताच्या पुजारा आणि कोहली यांना वगळता कोणालाही चांगली कामगिरी करता आली नसल्याने भारताला ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे इंग्लंडने मालिकेत ३-१ ची आघाडी घेतल्याने भारताच्या हातातून मालिका गेली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -