Ind vs Eng 5th test Live updates : भारताचा ११८ धावांनी पराभव

गेल्या महिनाभर चाललेल्या इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा सामना आता सुरू झाला असून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ही अंतिम कसोटी आहे. इंग्लंडने ५ पैकी ३ सामने याआधीच जिंकली असल्याने आजचा सामना केवळ औपचारिक आहे.

सौजन्य - Firstpost

 

 • शमीला बाद करत अँडरसनने नवा विक्रम केला आहे. कसोटी सामन्यांत तो सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज झाला आहे.
 • शमीला बाद करत अँडरसनने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.
 • इशांत आणि जडेजाही झटपट माघारी परतले आहेत.
 • रशीदने पंतलाही माघारी पाठवले.
 • १४९ धावांवर लोकेश राहुल बाद झाला असून भारताला हा सामना जिंकण्यासाठी अजून १३८ धावांची आवश्यकता आहे.
 • रिषभ पंतने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे.
 • भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने आपल्या कारकिर्दीतील ५ वे शतक झळकावले आहे.
 • पाचव्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. सलामीवीर लोकेश राहुलने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले आहे.
 • अडखळत्या सुरुवातीनंतर राहुल आणि रहाणेने भारताचा डाव सावरला आहे.
 • या संपूर्ण मालिकेप्रमाणेच भारताची सुरूवात अडखळती झाली आहे. भारताने अवघ्या एका धावेत धवन आणि पुजारा यांना गमावले.
 • इंग्लंडने आपला दुसरा डाव ८ बाद ४२३ वर घोषित केला आहे. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकण्यासाठी ४६४ धावांचे आव्हान आहे.
 • सामन्याच्या चौथ्या दिवशी टी पर्यंत इंग्लंडचा स्कोर ६ बाद ३६४ असा आहे.
 • शमीने बेरस्टोव आणि जडेजाने बटलरला झटपट माघारी पाठवले आहे.
 • हनुमा विहारीने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. त्याने शतकवीर कूक आणि रूट यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. 
 • सामन्यात लन्च ब्रेक झाला असून इंग्लंडची परिस्थिती २४३ वर दोन बाद अशी असून, कूक १०३ आणि रुट ९२ धावांवर खेळत आहे.
 • आपला शेवटचा सामना खेळत असलेल्या कूकने आपले शतक पूर्ण केले असून तो १०१ धावांवर खेळत आहे तर कर्णधार रूट ८० धावांवर खेळत आहे.
 • दुसऱ्या डावातही कूकने अर्धशतक पूर्ण केले असून तो सध्या ५६ धावांवर खेळत आहे.
 • भारताचा पहिला डाव २९२ धावांवर संपल्यानंतर आता इंग्लंड आपला दुसरा डाव खेळत आहे. सध्या इंग्लंडची अवस्था १२६ वर दोन बाद अशी आहे.
 • हनुमा विहारी ५६ धावांवर बाद झाल्यानंतर सध्या लन्च ब्रेक झाला असून भारताकडून रविंद्र जडेजा आणि इशांत शर्मा बॅटिंग करत आहेत. भारताची परिस्थिती २४० वर ७ बाद आहे.
 • आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या हनुमा विहारीने आपले अर्धशतक पूर्ण केले असून भारताची परिस्थिती ७६ ओव्हरनंतर २३७ वर ६ बाद आहे.
 • ६४ ओव्हरनंतर भारताच्या २०० धावा पूर्ण झाल्या असून भारताची स्थिती सध्या २०४ वर ६ बाद आहे.
 • भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटीचा तिसरा दिवस पुन्हा सुरू झाला असून सध्या भारत बॅटिंग करत आहे. भारताची परिस्थिती १७७ वर ६ बाद असून हनुमा विहारी २६ तर रविंद्र जडेजा १० धावांवर खेळत आहे.
 • भारताने राहुलच्या रूपात दुसरी विकेट गमावली आहे. ३७ धावांवर करनने त्याला बाद केले.
 • धवनला लवकर गमावल्यानंतर पुजारा आणि राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला.
 • भारताचा सलामीवीर पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला आहे. त्याला ३ धावांवर ब्रॉडने बाद केले.
 • इंग्लंडने पहिल्या डावात ३३२ इतकी मजल मारली. इंग्लंडकडून बटलरने सर्वाधिक ८९ धावा केल्यातर भारताकडून जडेजाने घेतल्या ४ विकेट्स. 
 • दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडचा स्कोर ८ बाद ३०४, बटलर आणि ब्रॉड जोडीने ९० धावांची भागीदारी केली.
 • दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच बुमराहने रशीदला माघारी पाठवले आहे.
 • पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडचा स्कोर ७ बाद १९८ असून बटलर आणि रशीद नाबाद आहेत. 
 • इंग्लंडकडून मालिकेत अप्रतिम कामगिरी केलेला सॅम यावेळी शून्यावर बाद झाला असून, इशांतने त्याची विकेट घेतली आहे.
 • इंग्लंडचा मोईन अली अर्धशतक करून बाद झाला आहे, इशांतच्या बॉलिंगवर पंतने त्याचा झेल घेतला आहे.
 • रविंद्र जडेजाने इंग्लंडच्या बेन स्टोक्सला बाद करत भारताला ५वे यश मिळवून दिले आहे.
 • इंग्लंडचा विकेटकिपर जॉनी बेरस्टोवचा देखील बाद झाला असून इशांतच्या बॉलिंगवर पंतने त्याचा झेल घेतला आहे.
 • इंग्लंडचा कर्णधार जो रूटलाही बूमराहने पायचीत बाद केले असून सध्या इंग्लंडची परिस्थिती १३४ वर ३ बाद आहे. 
 • इंग्लंडचा सलामीवीर अॅलेस्टर कूकला बुमराहमने बाद केले असून कूक ७१ धावांवर बाद झाला आहे.
 • सध्या कूक आणि मोईन अली मैदानात आहेत
 • सध्या सामन्यात टी-ब्रेक झाला असून ५९ ओव्हरनंतर इंग्लंड १२३ वर १ बाद अशी आहे.
 • आपला अखेरचा सामना खेळत असलेल्या अॅलेस्टर कूकने आपले अर्धशतक पूर्ण केले असून ४७ ओव्हरनंतर इंग्लंडची परिस्थिती सध्या १०६ वर एक बाद आहे.
 • लंच ब्रेक पर्यंत इंग्लंड १ बाद ६८ असून सध्या कूक आणि मोईन अली मैदानात आहेत.
 • भारताच्या रविंद्र जडेजाने इंग्लंडचा सलामीवीर जेनिंग्जला बाद केले आहे. जडेजाच्या बॉलिंगवर के एल राहुलने झेल पकडला आहे.
 • २० ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर ५६ वर एकही बाद नाही.
 • इंग्लंडने नाणेफेक जिंकत, सामन्यात बॅटिंग घेतली आहे.

 

आजच्या सामन्याच भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल असून हार्दीक पांड्याच्या जागी विहारीला संधी देण्यात आली आहे.

सौजन्य – Scroll.in

 

इंग्लंडचा सलामीवीर अॅलेस्टर कूकचा हा कारकिर्दीतील शेवटचा सामना असून त्याच्या चाहत्यांनी सामना पाहायला गर्दी केली आहे.

alastair cook
अलेस्टर कुक