Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा IND vs ENG : पंतनंतर टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ सदस्य पॉझिटिव्ह; आणखी...

IND vs ENG : पंतनंतर टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ सदस्य पॉझिटिव्ह; आणखी दोघे क्वारंटाईन

पुढील काही दिवसांत पंतची कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे.

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतनंतर थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच दयानंदच्या संपर्कात आलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि एका सपोर्ट स्टाफ सदस्याला खबरदारी म्हणून क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघाचे सर्व सदस्य डरहम येथे बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. परंतु, पंत आणि दयानंद यांना कोरोनाची बाधा झाल्याने, तर साहासह दोघांना खबरदारी म्हणून लंडन येथेच थांबावे लागले आहे.

पंत, साहा सराव सामन्याला मुकणार

पंत मागील आठ दिवस क्वारंटाईन असून त्याला आता कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. परंतु, तो इतर खेळाडूंसोबत डरहमला जाणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. पुढील काही दिवसांत पंतची कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे. परंतु, पंत आणि साहा या दोन्ही यष्टिरक्षकांना २० ते २२ जुलै या कालावधीत होणाऱ्या कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्धच्या सराव सामन्याला मुकावे लागणार आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलला यष्टिरक्षण करावे लागू शकेल.

युरो स्पर्धेचा सामना पाहणे पडले महागात?

- Advertisement -

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंना पत्र लिहून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मागील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना झाला. या सामन्यानंतर खेळाडूंना २० दिवसांची विश्रांती देण्यात आली होती. शाह यांनी खेळाडूंना विम्बल्डन आणि युरो २०२० स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी जाणे टाळा असे सांगितले होते. परंतु, पंतने २९ जूनला इंग्लंड आणि जर्मनी या संघांमधील युरो स्पर्धेचा सामना वेम्बली स्टेडियममध्ये जाऊन पाहिला होता.

- Advertisement -