घरक्रीडाIND Vs ENG: बुमराह 9 विकेट्स घेऊनही 'या'बाबतीत ठरला अपयशी

IND Vs ENG: बुमराह 9 विकेट्स घेऊनही ‘या’बाबतीत ठरला अपयशी

Subscribe

नवी दिल्ली: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची दुसरा कसोटी सामना जिंकला. भारताने हा सामना 106 धावांनी जिंकला आणि त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली. भारताच्या विजयात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जैस्वालने पहिल्या डावात द्विशतक झळकावले. गिलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. मात्र जसप्रीत बुमराहनेही विजयात अप्रतिम योगदान दिले. या वेगवान गोलंदाजाने सामन्यात 9 विकेट घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र, या कामगिरीदरम्यान तो विक्रम रचण्यात चुकला आणि तीन वर्षांपूर्वी त्याला अशाच अपयशाचा सामना करावा लागला होता. (IND Vs ENG Jasprit Bumrah fails in to crossed record of Chetan Sharma )

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध 91 धावांत 9 विकेट घेतल्या होत्या. हे त्याचे इंग्लंडविरुद्धचे सर्वोत्तम आकडे आहेत. यापूर्वी 2023 मध्ये त्याने नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडविरुद्ध 110 धावांत 9 विकेट घेतल्या होत्या. मात्र, या उत्कृष्ट कामगिरीनंतरही तो चेतन शर्माचा मोठा विक्रम मोडू शकला नाही. चेतन शर्माच्या नावावर इंग्लंडविरुद्ध 10 विकेट घेण्याचा विक्रम आहे, जो त्याने 1986 मध्ये एजबॅस्टन कसोटीत केला होता. बुमराह दोनदा या विक्रमाच्या जवळ आला आणि दोन्ही वेळा एक विकेटमुळे विक्रम करण्यापासून हुकला.

- Advertisement -

जैस्वाल आणि गिल यांनी चमकदार कामगिरी केली यात शंका नाही पण जसप्रीत बुमराहनेच टीम इंडियाच्या बाजूने सामना फिरवला. बुमराहच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या 253 धावांत आटोपला होता. बुमराहने भारतीय भूमीवर आपल्या यशाचे मुख्य कारण सांगितले.

बुमराह म्हणाला की, मी खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार माझा प्लॅन बनवतो आणि मग त्यानुसार तयारी करतो. त्यामुळेच बुमराह भारतीय खेळपट्ट्यांवरही यशस्वी ठरतो. बुमराहने या कसोटी मालिकेत आतापर्यंत 2 सामन्यात 15 बळी घेतले आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: IND vs ENG: इंग्रजांना चारली धूळ; 106 धावांनी भारताचा दणदणीत विजय )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -