घरक्रीडाInd vs Eng: धवनने स्टोक्सचा कॅच घेताच पांड्याने केला वाकून नमस्कार; विराट...

Ind vs Eng: धवनने स्टोक्सचा कॅच घेताच पांड्याने केला वाकून नमस्कार; विराट देखील हसू लागला, पाहा व्हिडिओ

Subscribe

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर होत आहे. या निर्णायक सामन्यात भारताचा स्टार फिल्डर हार्दिक पांड्याने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या बेन स्टोक्सचा सहजपणे झेल सोडला. इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करायला दिली. भारताने प्रत फलंदाजी करताना ३२९ धावा करत ३३० धवांचं लक्ष्य दिलं. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव सुरुवातीला गडगडला. सलामीवर तंबूत परतल्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये असलेला बेन स्टोक्स मैदानात आला. स्टोक्स चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसत होता.

सामन्याच्या पाचव्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या नाकल बॉलवर बें स्टोक्सने जोराचा फटका मारला. मात्र, टायमिंग नीट न झाल्यामुळे मैदानाबाहेर गेला नाही. स्टोक्स या चेंडूवर झेलबाद होणार होता. मात्र, हार्दिक पांड्याने तो झेल सोडला. साधा सोपा झेल सोडल्यामुळे मैदानातील खेळाडूंसह डग आउटमधील सर्वांनाच धक्का बसला. यानंतर नटराजनच्या चेंडूवर स्टोक्सने फटकवलेला चेंडू शिखर धवनने सीमारेषेवर झेल घेतला. यानंतर हार्दिक पांड्याने शिखर धवनला वाकून नमस्कार केला. यानंतर संघातील सर्वच खेळाडूंना हसू आवरेना.

- Advertisement -

शिखर धवन, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याच्या तडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने सर्वबाद ३२९ धावा दकरत ३३० धवांचं लक्ष्य दिलं. भारताच्या तीनशेपार आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वर कुमारने जेसन रॉयला १४ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर मागील सामन्यात शतकी खेळी केलेल्या जॉनी बेअरस्टोला वैयक्तिक एका धावेवर पायचित पकडले. त्यानंतर इंग्लंडला डेव्हिड मलान आणि बेन स्टोक्सकडून चांगल्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र, नटराजनच्या गोलंदाजीवर स्टोक्स झेलबाद झाला. त्याने ३५ धावा केल्या. स्टोक्सनंतर आलेला बटलरही काही खास कामगिरी करू शकला नाही. शार्दुल ठाकूरने त्याला वैयक्तिक १५ धावांवर पायचित पकडले. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी २७ षटकांमध्ये १७८ धावांची आवश्यकता आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -