भारतीय संघ दुसरे ‘चोकर्स’; कपील देव यांनीही केलं मान्य

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. अनेक तज्ज्ञही या पराभवावर आणि भारतीय संघाच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

kapil dev
कपिल देव यांचे मत

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. अनेक तज्ज्ञही या पराभवावर आणि भारतीय संघाच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या पराभवानंतर आयसीसीचे जेतेपद पटकावण्यात वारंवार अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला दुसरे ‘चोकर्स’ म्हटले जात आहे. विशेष म्हणजे भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही हे सत्य मान्य केले आहे. (ind vs eng semi final match kapil dev said you can call them chokers on india repeated t20 world cup failures)

1983 मध्ये देशाला विश्वचषक जिंकून देणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यावेळी कपील देव म्हणाले की, संघाला चोकर्स म्हणता येईल. भारतीय संघाला चोकर असे लेबल लावण्यात काहीही गैर नाही.

कपिल देव पुढे म्हणाले की, खेळाडूंना चांगले दिवस येत नाहीत. कारण याच खेळाडूंनी स्वतःच्या बळावर देशाचे नाव मोठं केलं आहे. त्यामुळे या पराभवानंतर लोकांनी भारतीय संघावर जास्त दबाव टाकू नये, असे आवाहन कपिल देव यांनी केले. “मी सहमत आहे, भारतीय संघाने खराब खेळी केली. परंतु केवळ एका खेळाच्या आधारे आम्ही जास्त टीका करू शकत नाही”, असेही कपील देव यांनी म्हटले.

अनेक खेळाडू संघर्ष करताना दिसले

“टी-20 विश्वचषकात अनेक भारतीय खेळाडूंनी खराब कामगिरी केली. मात्र, केएल राहुल, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल संघर्ष करताना दिसले”, असेही कपील देव यांनी म्हटले.


हेही वाचा – न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलण्याची शक्यता; ‘या’ माजी खेळाडूच्या नावाची चर्चा