घरक्रीडाInd vs Eng T20 : पदार्पणात ईशानचा झंझावात; भारताचा इंग्लडवर विजय

Ind vs Eng T20 : पदार्पणात ईशानचा झंझावात; भारताचा इंग्लडवर विजय

Subscribe

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात इशान किशन आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडवर ७ विकेट्सने मात केली आहे. यासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात १७.५ षटकांत पूर्ण केलं.

इंग्लडने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर के एल राहुल शुन्यावर बाद झाल्याने, भारतीय संघाला पहिला मोठा झटका बसला. तेव्हा भारतीय संघाने देखील आपलं खातं उघडलं नव्हतं. सॅम करनने के एल राहुलला बाद केलं. जोस बटलरने त्याचा यष्टीमागे झेल टिपला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि इशान किशन यांनी डावाला सावरलं. पदार्पणाच्या सामन्यात इशान किशनने स्फोटक फलंदाजी करत २८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

- Advertisement -

विराट कोहली आणि इशान किशन यांनी सहा षटकांत त्यांनी ५० धावांची भागीदारी केली. भारतीय संघाची १० षटकात ९४ धावासंख्या असताना इशान किशन ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला. आदिल रशीदने त्याला एलबीडब्ल्यू बाद केलं. यानंतर धावसंख्या १३० असताना १३ व्या षटकात रिषभ पंत १३ चेंडूत २६ धावा काढून झेल बाद झाला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या षटकात जॉनी बेअरस्टोने त्याचा झेल टिपला व भारताचा तिसरा गडी बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने कर्णधाराला साजेसी खेळी करत ४९ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या.


हेही वाचा – Ind vs Eng: सूर्यकुमार-ईशान किशनची प्रतीक्षा संपली, दुसर्‍या टी -२० मध्ये केलं पदार्पण

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -