Homeक्रीडाIND Vs ENG : चार दिग्गजांविनाच मैदानात उतरणार टीम इंडिया; इंग्लंडशी बरोबरी...

IND Vs ENG : चार दिग्गजांविनाच मैदानात उतरणार टीम इंडिया; इंग्लंडशी बरोबरी साधण्याची ‘कसोटी’

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला पुढील काही वेळातच सुरुवात होणार आहे. विशाखापट्टणम येथे आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्याकडे सर्क क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. कारण, पहिला सामना जिंकून इंग्लंड आघाडीवर असून, इंग्लंड संघाशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडिया प्रयत्न करणार आहे.

विशाखापट्टणम : भारतविरुद्ध इग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आजपासून (2 फेब्रुवारी) दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरुवात होणार आहे. विशाखापट्टणच्या मैदानावर दोन्ही संघ विजयाच्या उद्देशानेच मैदानावर उतरणार आहे. असे असतानाच मात्र, भारतीय संघात या कसोटी सामन्यासाठी बदल करण्यात आले असून, तब्बल चार दिग्गज या सामन्यात खेळणार नाहीत. तेव्हा इंग्लंडच्या संघाशी बरोबरी साधण्याची टीम इंडियाची आज खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ असणार आहे. (IND Vs ENG Team India will enter the field without four veterans Test to match England)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला पुढील काही वेळातच सुरुवात होणार आहे. विशाखापट्टणम येथे आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्याकडे सर्क क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. कारण, पहिला सामना जिंकून इंग्लंड आघाडीवर असून, इंग्लंड संघाशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडिया प्रयत्न करणार आहे.

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर विशाखापट्टणम येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजयासह पुनरागमन करण्याचे दडपण भारतीय क्रिकेट संघावर असेल. भारतीय संघासमोरचे आव्हान आणखी मोठे आहे कारण विराट कोहली या कसोटी सामन्यातून बाहेर आहे. यासोबतच केएल राहुल आणि रवींद्र जडेजासारखे दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. तेव्हा भारतीय संघाला इंग्लंडला नमविण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहे.

हेही वाचा : Mumbai Congress : सिद्दीकी पिता-पुत्र करणार काँग्रेसला रामराम; ‘हाता’वर बांधणार दादा गटाचं घड्याळ

डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त असला तरी पाचशे बळी पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांना नवे नियोजन करावे लागणार आहे. इंग्लंडचे फलंदाज कोणत्याही परिस्थितीत आपली आक्रमक वृत्ती स्वीकारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. हैदराबाद कसोटीत 28 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने भारतीय गोलंदाजांचे कान टोचले होते. तर पुढील कसोटी सामन्यात कशी गोलंदाजी करावी लागणार याचेही धडे दिले होते. तेव्हा या आजच्या सामन्यात ती रणनीती दिसून येते का हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : Eknath Shinde : मध्यान्ह भोजन आता आठवीपुढेही? कुपोषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न

असे आहेत दोन्ही संघ

इंग्लंडचा संघ जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन असा असणार आहे तर भारताच्या संभाव्य संघामध्ये यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार किंवा सरफराज खान, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत , आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर असा असणार आहे.