घरक्रीडाIND vs ENG Test : उर्वरित सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा! विराटच्या पुनरागमनावर...

IND vs ENG Test : उर्वरित सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा! विराटच्या पुनरागमनावर द्रविड म्हणाले…

Subscribe

नवी दिल्ली : भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बरोबरी साधली आहे. आता मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. मात्र त्याआधी उर्वरीत कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उर्वरित सामन्यांसाठी विराट कोहली पुनरागमन करणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. अशातच आता प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहली खेळणार की नाही यासंदर्भात माहिती दिली आहे. (IND vs ENG Test Indian Team Announced Today for Remaining Matches Rahul Dravid said on Virat Kohli comeback)

हेही वाचा – Piyush Goyal : पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याची शक्यता; ‘या’ भाजपा आमदाराचा पत्ता होणार कट?

- Advertisement -

विराट कोहली पुनरागमन करणार की नाही, यासंदर्भात माहिती देताना राहुल द्रविड म्हणाले की, “मला वाटते की यासंदर्भात निवडकर्त्यांना विचारणे योग्य ठरेल. पण मला खात्री आहे की ते पुढील तीन कसोटींसाठी संघ निवडण्यापूर्वी उत्तर देण्यास तयार असतील. आम्ही त्यांच्याशी विराटबद्दल चर्चा करू. मला खात्री आहे की पुढील काही दिवसात संघाची निवड होईल. त्यामुळे बीसीसीआयचे निवडकर्ते अंतिम तीन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यापूर्वी विराट कोहलीशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

‘या’ तीन खेळाडूंचे होणार पुनरागमन?

माध्यमातील वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतासाठी अर्धशतक झळकावणारा केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. मात्र आता तो पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. याशिवाय विश्रांती घेतलेल्या मोहम्मद सिराजलाही निवड समिती संघात संधी देऊ शकते. तसेच केएस भरतच्या सततच्या खराब कामगिरीमुळे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर इशान किशनला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी देऊ शकतो, असा दावाही करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ‘बेपत्ता’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर

पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी संभाव्य संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, सौरभ कुमार, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज आणि आवेश खान.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -