घरक्रीडाIND Vs ENG Test: भारत-इंग्लंड कसोटीवर खलिस्तानी अतिरेकी 'पन्नू'ची नजर; सामना रद्द...

IND Vs ENG Test: भारत-इंग्लंड कसोटीवर खलिस्तानी अतिरेकी ‘पन्नू’ची नजर; सामना रद्द करण्याची धमकी

Subscribe

रांची: भारत आणि इंग्लंड यांच्यात रांचीमध्ये चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे, मात्र त्याआधीच तो रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी क्रिकेट सामना रद्द करण्याची धमकी देणारा दुसरा कोणी नसून खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू आहे. मात्र, आता त्या दहशतवाद्यावर कारवाई करण्यात आली असून सामना रद्द करण्याची धमकी दिल्याप्रकरणी झारखंड पोलिसांनी मंगळवारी अमेरिकेत राहणारा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. (IND Vs ENG Test Khalistani militant Pannu eyes India Eng Test Threatened to cancel the match)

गृह मंत्रालयाने दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केलेल्या पन्नूने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) (माओवादी) ला क्रिकेट सामन्यात व्यत्यय आणण्याचे आवाहन केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथील ‘जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स’ येथे सुरू होणार आहे.

- Advertisement -

हटियाचे पोलीस उपअधीक्षक पीके मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू याने रांची येथे होणारा सामना रद्द करण्याची धमकी भारतीय आणि इंग्लंड संघाला दिली आहे. त्यांनी सीपीआय (माओवादी) ला सामना उधळून लावण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून सामना रद्द होईल.” ते म्हणाले, ‘आयटी (माहिती तंत्रज्ञान) कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध धुर्वा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नू 2019 पासून राष्ट्रीय तपास संस्थेच्या रडारवर आहे. तो धमक्या देऊन पंजाब आणि देशात इतरत्र भीती आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

3 फेब्रुवारी 2021 रोजी विशेष एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) न्यायालयाने पन्नूविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते आणि नंतर त्याला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते. अमेरिका आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या पन्नूवर आपली पकड घट्ट करत NIA ने सप्टेंबर 2023 मध्ये अमृतसर, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेशात असलेल्या बेकायदेशीर ‘सिख्स फॉर जस्टिस’ (SFJ) संघटनेच्या स्वयंघोषित जनरल कौन्सिलचे घर आणि जमीन जप्त केली होती.

(हेही वाचा: IND vs ENG 4th Test: KL राहुल आणि जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर; तर मुकेश कुमारचे पुनरागमन)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -