घरक्रीडाIND vs ENG: इंग्रजांना चारली धूळ; 106 धावांनी भारताचा दणदणीत विजय

IND vs ENG: इंग्रजांना चारली धूळ; 106 धावांनी भारताचा दणदणीत विजय

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्रजांना धूळ चारली आहे. 106 धावांनी भारतीय संघाने हा सामना आपल्या खिशात घातला आहे.

नवी दिल्ली: IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्रजांना धूळ चारली आहे. 106 धावांनी भारतीय संघाने हा सामना आपल्या खिशात घातला आहे.  इंडियाने 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. सध्या भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन 500 टेस्ट विकेट घेण्यापासून केवळ एक विकेट दूर आहे. (IND vs ENG The English were beaten India s resounding victory by 106 runs)

भारताकडून इंग्लंडचा 106 धावांनी पराभव

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने पहिली कसोटी 28 धावांनी जिंकली होती. तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे.

- Advertisement -

भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावा करून सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली होती. गिलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारताने इंग्रजांना 292 धावांत गुंडाळून सामना जिंकला.

शुभमन गिल दुसऱ्या डावात चमकला

दुसऱ्या डावात टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने उत्कृष्ट खेळी केली. त्याने 147 चेंडूत 104 धावा केल्या होत्या. पण भारतीय संघ दुसऱ्या डावात 255 धावांवरच मर्यादित राहिला. अशा स्थितीत टीम इंडियाने या सामन्यात चौथ्या डावात इंग्लंडला 399 धावांचे लक्ष्य दिले होते. पण लक्ष्य गाठण्याआधीच इंग्लंडचा संघ ऑलआऊट झाला.

- Advertisement -

पहिल्या कसोटीत आघाडी घेऊनही सामना गमावण्याची नामुष्की पहिल्या कसोटीत भारतीय संघावर ओढावली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातील कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

( हेही वाचा: Cabinet Meeting : मालमत्ता करात मुंबईकरांना दिलासा, शिर्डी विमानतळाचा विस्तार; मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -