घरक्रीडाIND Vs ENG: पाचव्या कसोटीसाठी धर्मशाळेत 'या' खेळांडूसह उतरणार; वाचा- कोणाला मिळाली...

IND Vs ENG: पाचव्या कसोटीसाठी धर्मशाळेत ‘या’ खेळांडूसह उतरणार; वाचा- कोणाला मिळाली संधी?

Subscribe

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप या खेळाडूंचा समावेश आहे.

धर्मशाळा : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी 16 सदस्यीय संघाची निवड केली आहे, ज्यामध्ये भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. तर अनुभवी फलंदाज केएल राहुल हा सामना खेळणार नाही. (IND vs ENG Will land in Dharamsala for fifth Test with this player Read Who got a chance)

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप या खेळाडूंचा समावेश आहे.

- Advertisement -

जसप्रीत बुमराह परतला

संघाच्या वर्कलोड मॅनेजमेंट धोरणांतर्गत रांची येथील चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज बुमराह 7 मार्चपासून धर्मशाळा येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी संघात सामील होणार आहे. तर वॉशिंग्टन सुंदरला संघातून डच्चू देण्यात आला आहे. कारण तो तामिळनाडूसाठी रणजी ट्रॉफीचा उपांत्य सामना खेळणार आहे. रांचीमधील चौथी कसोटी जिंकून भारताने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा : Sushmai Andhare : जरांगेंची एसआयटी म्हणजे फडणवीसांचे ‘कहीं पे निगाहें…’, अंधारेंची गुगली

- Advertisement -

असा आहे धर्मशाळेवरील रेकॉर्ड

धर्मशाळेच्या मैदानावर भारतीय संघ प्रथमच इंग्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे. 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात धर्मशाळेच्या मैदानावर सामना खेळविल्या गेला होता. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 300 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या डावात 332 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 137 धावा करत सर्वबाद झाला तर भारताने दुसऱ्या डावात 106 धावा करून सामना जिंकला. भारताने हा सामना आठ गडी राखून जिंकला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विजयाची नोंद करण्याकडे संघाचे लक्ष असेल.

हेही वाचा : Maharashtra Budget Session : “आपल्याला काय…”, अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटलांनी सरकारला सुनावले

आर. अश्विन रचणार इतिहास

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील शेवटच्या सामन्यात रविचंद्रन अश्विन इतिहास रचणार आहे. 7 मार्च रोजी, अनुभवी फिरकी गोलंदाज धर्मशाळा येथे त्याच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. भारतासाठी 99 कसोटी सामन्यांमध्ये 507 बळी घेणारा अश्विन हा 100 वा कसोटी सामना खेळणारा 14वा भारतीय खेळाडू ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -