Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा IND vs ENG Women : वॅटची मॅचविनिंग खेळी; इंग्लंड महिला संघाची टी-२०...

IND vs ENG Women : वॅटची मॅचविनिंग खेळी; इंग्लंड महिला संघाची टी-२० मालिकेत बाजी

इंग्लंड महिला संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी बाजी मारली.

Related Story

- Advertisement -

सलामीवीर डॅनी वॅटच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीमुळे इंग्लंड महिला संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ८ विकेट राखून मात केली. या विजयासह इंग्लंड महिला संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी बाजी मारली. भारतीय महिला संघाने या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात कसोटी सामन्याने केली होती. फॉलोऑन मिळाल्यानंतरही भारतीय महिला संघाला हा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आले होते. परंतु, यानंतरच्या एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मालिका भारताने २-१ या फरकाने गमावल्या.

मानधनाच्या ७० धावा 

दौऱ्यातील अखेरच्या आणि टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेफाली वर्मा (०) आणि हर्लीन देओल (६) या भारताच्या युवा फलंदाज झटपट बाद झाल्या. यानंतर स्मृती मानधना (५१ चेंडूत ७०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२६ चेंडूत ३६) यांनी भारताला सावरले. तर अखेरच्या षटकांत रिचा घोषने चार चौकारांसह २० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ६ बाद १५३ अशी धावसंख्या उभारली.

वॅटला स्किवरची साथ 

- Advertisement -

याचा पाठलाग करताना इंग्लंडची सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्टला ११ धावांवर दीप्ती शर्माने बाद केले. परंतु, वॅटने उत्कृष्ट फलंदाजी करत ५६ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावांची खेळी केली. तिला नॅट स्किवरची (४२) उत्तम साथ लाभली. स्किवर बाद झाल्यावर कर्णधार नाईटच्या (नाबाद ६) साथीने वॅटने इंग्लंडला सामना जिंकवून दिला. त्यामुळे इंग्लंडने टी-२० मालिका २-१ अशी जिंकली.

- Advertisement -