बंगळुरू : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवाळीच्या मुहूर्तावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 विकेट गमावत 410 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यानंतर भारतीय संघाने नेदरलँड संघाचा 160 धावांनी पराभव करत विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकत नवमी साजरी केली. (IND vs NED Indian teams ninth victory in World Cup Netherlands team lost by 160 runs)
हेही वाचा – IND vs NED : श्रेयस-राहुलचे विक्रमी शतक; ‘हे’ रेकॉर्ड केले नावावर
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रोहितने शुभमन गिलसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागिदारी रचली. यानंतर शुभमन गिल 51 धावा करून बाद झाला आणि थोड्याच वेळात रोहित शर्माही 61 धावा करून बाद झाली. यानंतर विराट कोलहीने श्रेयस अय्यरसोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागिदारी रचली. मात्र विराट कोहली 51 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी 208 धावांची भागिदारी करत नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा अक्षरश: धुव्वा उडवला.
India finish the #CWC23 group stage without a loss 🎇#INDvNED 📝: https://t.co/rdhNma7Bsu pic.twitter.com/OofFUwQ6VN
— ICC (@ICC) November 12, 2023
श्रेयस अय्यरने 94 चेंडूंत 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 128 धावांची खेळी केली. त्याने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. विश्वचषकातील त्याचे हे पहिलेच शतक आहे. याशिवाय केएल राहुलने 64 चेंडूंत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. त्याने 62 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे शतक भारतासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले.
हेही वाचा – ‘त्या’ बैठकीत काय घडले होते? मिस्बाहचा मोठा खुलासा, बाबर आझम आणि कोचवर केले गंभीर आरोप
कर्णधार रोहितने 61 आणि शुभमन गिल आणि विराट कोहलीने प्रत्येकी 51 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या खेळीमुळे भारतीय संघाने 4 विकेट गमावत 410 धावांचा डोंगर उभा केला. विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध 413 धावा केल्या होत्या. नेदरलँड्सकडून जस्ट डी लीडेने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या, तर मीकरेन आणि मर्व्ह यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
भारतीय संघाची नवमी
भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्वच्या सर्व नऊ सामने जिंकले आहेत. भारताने या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचा पराभव केला आहे. गुणतालिकेत भारतीय संघ 18 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाला आता उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाशी सामना करायचा आहे.
Shreyas Iyer is the @aramco #POTM for a sensational batting display in Bengaluru 🎉#CWC23 | #INDvNED pic.twitter.com/mzmNgLpoKw
— ICC (@ICC) November 12, 2023
नेदरलँड संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर
भारताकडून मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर वेस्ली बॅरेसीने फक्त 4 धावा करून बाद झाला. यानंतर मॅक्स ओडाडने आणि कॉलिन अकरमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागिदारी केली. मात्र कॉलिन अकरमन 35 धावा करून बाद झाला आणि थोड्याच वेळात मॅक्स ओडाड 30 धावा करून बाद झाला. त्यानतंर थोड्या थोड्या अंतराने नेदलँड संघाच्या विकेट पडत राहिल्या. त्यामुळे संघ 47.5 षटकात 250 धावांवर सर्वबाद झाला. नेदरलँड्ससाठी तेजा निदामनुरूने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. याशिवाय सायब्रँडने 45 धावा, तर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 17 धावा, लोगान व्हॅन बीक व रोएलॉफ व्हॅन डर मर्वे प्रत्येकी 16 धावा आणि बास डी लीडेने 12 धावांचे योगदान दिले. या पराभवानंतर नेदरलँड्स संघ विश्वचषक स्पर्धेत 10व्या स्थानावर आहे. त्यांना नऊ सामन्यांत फक्त दोन विजय मिळवता आले तर, सात सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे नेदरलँड संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
भारताच्या नऊ खेळाडूंनी केली गोलंदाजी
या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने केएल राहुल आणि श्रेयस अय्यर सोडल्यास 11 पैकी नऊ खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी दिली. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. विशेष म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र मोहम्मद शमी, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना एकही विकेट घेता आली नाही.