बंगळुरू : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवाळीच्या मुहूर्तावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 विकेट गमावत 410 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. अशातच श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी विक्रमी शतक केले. (IND vs NED Shreyas Iyer Kl Rahul record century bengaluru chinaswami stedium icc odi world cup 2023)
हेही वाचा – बंगळुरूमध्ये भारतीय खेळाडूंकडून चौकार-षटकारांची आतषबाजी; नेदरलँड्स समोर 411 धावांचे आव्हान
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रोहितने शुभमन गिलसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागिदारी रचली. यानंतर शुभमन गिल 51 धावा करून बाद झाला आणि थोड्याच वेळात रोहित शर्माही 61 धावा करून बाद झाली. यानंतर विराट कोलहीने श्रेयस अय्यरसोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागिदारी रचली. मात्र विराट कोहली 51 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतक करताना 208 धावांची भागिदारी करत नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा अक्षरश: धुव्वा उडवला.
After a couple of near-misses, Shreyas Iyer finally scores his maiden @cricketworldcup century 🤩@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvNED pic.twitter.com/JI3zJnHcIQ
— ICC (@ICC) November 12, 2023
श्रेयसचे विश्वचषकातील पहिले शतक
श्रेयस अय्यरने 94 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 128 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने विश्वचषकात आपले पहिले शतक पूर्ण केले. याशिवाय विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक करणारा श्रेयस भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 12 वर्षांनंतर भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. युवराज सिंगने 2011 च्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी शेवटचे शतक झळकावले होते. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 113 धावांची खेळी केली होती. त्याचवेळी सचिन तेंडुलकरने त्याच्या आधी ही कामगिरी केली होती. सचिनने 1999 च्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केनियाविरुद्ध 140 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
KL Rahul nailed the ball around the park to bring up India’s fastest @cricketworldcup century 👊@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvNED pic.twitter.com/yncw2ZojAK
— ICC (@ICC) November 12, 2023
केएल राहुलचे विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक
केएल राहुलने 64 चेंडूत 11 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या. परंतु त्याने 62 चेंडूत भारतासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक केले. असे करताना केएल राहुलने रोहितचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक झळकावले होते.
विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक
62 चेंडू – केएल राहुल विरुद्ध नेदरलँड्स, 2023
63 चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, 2023
81 चेंडू – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध बर्म्युडा, 2007
83 चेंडू – विराट कोहली विरुद्ध बांगलादेश, 2011
हेही वाचा – Rohit Sharma : 61 धावांच्या खेळीत अनेक पराक्रम; डिव्हिलियर्स, गांगुली, मॉर्गनचा विक्रम मोडीत काढला
विश्वचषकात राहुलचे पाचवे जलद शतक
केएल राहुने नेदरलँड्सविरुद्ध 100 धावांची खेळी करताना या विश्वचषकातील पाचवे जलद शतक केले आहे. या विश्वचषकात सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. त्याने नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावले होते. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम 49 चेंडूत शतकासह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 59 चेंडूत शतक झळकावले होते. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 61 चेंडूत शतक झळकावले होते.