घरक्रीडाIND vs NED : दुसऱ्या विजयासह टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी

IND vs NED : दुसऱ्या विजयासह टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी

Subscribe

भारताने 56 धावांनी नेदरलॅडचा पराभन करत टी-20 विश्वचषकात दुसरा विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

भारताने 56 धावांनी नेदरलॅडचा पराभन करत टी-20 विश्वचषकात दुसरा विजय मिळवला आहे. या विजयसह भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारताने हा सामना जिंकून 4 गुणांसह तालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर दक्षिण आफ्रिकेने आज बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून 3 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. बांगलादेशच्या नावावरही 2 गुण आहेत. (IND vs NED T20 World Cup Team India became a table toper in group 2)

भारत आणि नेदरलॅंड यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 180 धावांचे आव्हान ठेवले. शिवाय, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग व आर अश्विन यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली. भारताच्या या विजयाने पाकिस्तानला धडकी भरली.

- Advertisement -

आजच्या सामन्यात रोहित शर्माने टी-20 मधील 29वे अर्धशतक पूर्ण केले. तसेच, त्याने टी-20 विश्वचशकामध्ये भारताकडून सर्वाधिक 34 षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. युवराज सिंगचा 33 षटकारांचा विक्रम रोहितने मोडला. त्याशिवाय, आयसीसी स्पर्धांमध्ये रोहितचे हे 23 वी 50+ खेळी ठरली.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितने (9) ख्रिस गेलशी बरोबरी केली, या विक्रमात विराट (11) अव्वल स्थानावर आहे. रोहित 39 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 56 धावा करून बाद झाला. विराटसह त्याने 56 चेंडूंत 73 धावांची भागीदारी केली. विराट व सूर्यकुमार यादव यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि ४८ चेंडूंत नाबाद ९५ धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘नव्या युगाची सुरुवात…’; BCCIच्या मानधनाच्या निर्णयावर महिला खेळाडूंची प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -