India vs New Zealand 2021: पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनला रेकॉर्ड ब्रेक करण्याची सुवर्णसंधी, भज्जीलाही टाकू शकतो मागे

कानपूरमध्ये होणाऱ्या सामन्यात अश्विन भज्जीला मागे टाकू शकतो...

टी-२० सामन्यानंतर आता कसोटी सामनाच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतामधून सर्वात जास्त कसोटी सामना खेळणारा भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग तिसऱ्या स्थानावर आहे. परंतु न्यूझीलंडच्या विरूद्ध सामन्यात खेळण्यात येणाऱ्या दोन कसोटी सामन्यांपैकी भारताचा फिरकीपटू आर. अश्विनजवळ रेकॉर्ड तोडण्याची सुवर्णसंधी आहे. कसोटी सामन्यामध्ये भारतातून सर्वात जास्त ४०० पेक्षा अधिक विकट घेणारे गोलंदाज आहेत. अनिल कुंबळे यांनी ६१९ विकेट घेतले आहेत. तर कपिल देव यांच्या खात्यात ४३४, हरभजन सिंग ४१७ आणि अश्विनच्या खात्यात आता ४१३ विकेट आहेत. परंतु भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात अश्विनने पाच विकेट घेतले तर तो हरभजन सिंगच्या पुढे निघून जाऊ शकतो. कारण अश्विनला हीच मोठी संधी आहे. कसोटी मालिकेसाठी हरभजनच्या खात्यात ४१७ विकेट आहेत. तर अश्विनच्या खात्यात आता ४१३ विकेट आहेत. या दोघांमध्ये ४ विकेटचा फरक आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या दोन कसोटी मालिका खेळण्यात येणार आहेत. या दोन्ही संघामध्ये पहिला सामना २५ नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. तसेच हा सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. कानपूरच्या कसोटी सामन्यात अश्विन नवी खेळी आणि शक्तीप्रदर्शन करू शकतो. त्याच्या सरावाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलं आहे. भज्जीने १०३ कसोटी सामन्यांत १९० इनिंगमध्ये ४१७ खेळाडूंना बाद केलं आहे. तर अश्विनने ७९ कसोटी सामन्यांत १४८ इनिंगमध्ये ४१३ खेळाडूंचे विकेट घेतले आहेत.

अश्विनने प्रत्येक मैदानात आपल्या खेळातून चांगलं प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे कानपूरमध्ये होणाऱ्या सामन्यात अश्विन भज्जीला मागे टाकू शकतो. अश्विनने एकूण ४७ कसोटी सामने घरातल्या स्टेडियमवर खेळले आहेत. याचदरम्यान, ९१ इनिंगमध्ये २१.८९ च्या सरासरीत त्याचा स्ट्राईक रेट ४७.८ इतका आहे. तर त्याने एकूण २८६ गडींना बाद केलं आहे. अश्विनने २४ वेळा कसोटी सामन्यामध्ये पाच आणि सहा वेळा १० विकेट घेतल्या आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ग्रीन पार्क येथे खेळण्यात येणारा सामना आणि इतिहास हा ४५ वर्षांचा आहे. तसेच भारताच्या विजयाची आकडेवारी सुद्धा १०० टक्के इतकी आहे. या मैदानावर खेळताना न्यूझीलंडच्या हातात सध्या काहीच लागलेलं नाहीये. त्यामुळे २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडला इतिहास बदलण्याची संधी आहे. तसेच भारतीय संघाला सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.