घरक्रीडाIND vs NZ: न्यूझीलंडचा पहिल्या वनडे सामन्यात भारतावर दमदार विजय

IND vs NZ: न्यूझीलंडचा पहिल्या वनडे सामन्यात भारतावर दमदार विजय

Subscribe

या सामन्यात न्यूझीलंडकडून फलंदाज टॉम लॅथमने 145 धावांची तुफानी खेळी केली. तसेच, केन विल्यमसनने त्याला चांगली साथ देत 94 धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांच्या खेळीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पराभव झाला आहे. यष्टिरक्षक टॉम लॅथमचे शानदार शतक आणि केन विल्यमसनच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने या सामन्यात विजय मिळवला आहे. (ind vs nz 1st odi new Zealand win match by 7 wickets against India Kane Williamson tom Latham century)

या सामन्यात न्यूझीलंडकडून फलंदाज टॉम लॅथमने 145 धावांची तुफानी खेळी केली. तसेच, केन विल्यमसनने त्याला चांगली साथ देत 94 धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांच्या खेळीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून शार्दुल ठाकूरने एक आणि उमरान मलिकने 2 बळी घेतले. विशेष म्हणजे उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनी या सामन्यातून टीम इंडियासाठी पदार्पण केले.

- Advertisement -

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या 76 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी, शुभमन गिल आणि शिखर यांच्या शतकी भागीदारीमुळे (124 धावा) भारताने 50 षटकात 7 गडी गमावून 306 धावा केल्या. त्याचबरोबर न्यूझीलंडला विजयासाठी 307 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर कर्णधार शिखर धवन आणि शुभनम गिल यांनी शतकी भागीदारी केली. मात्र, आपले अर्धशतक पूर्ण करताना गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर गिल झेलबाद झाला.

पुढच्याच षटकात कर्णधार शिखर धवन पॅव्हेलियनमध्ये परतला. टीम साऊदीच्या चेंडूवर धवन गोलंदाज फिन ऍलनकरवी झेलबाद झाला. यादरम्यान त्याने 77 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली. त्यानंतर पंतने क्रीजवर येऊन अय्यरसह डावाचे नेतृत्व केले. अय्यरने आपली शानदार खेळी खेळून सर्वांना चकित केले आणि 76 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. मात्र, सौदीच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि तो झेल कॉनवेकडे सोपवला.

- Advertisement -

गोलंदाज टीम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसन यांनी 3-3 बळी घेतले. सौदीने धवन, अय्यर आणि शार्दुल ठाकूरला चालायला लावले. त्याचवेळी फर्ग्युसनने गिल, पंत आणि सूर्यकुमार यादव यांना चालायला लावले. अॅडम मिल्नेने फलंदाज संजू सॅमसनची विकेट घेतली.


हेही वाचा – बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; मात्र मालिकेपूर्वीच संघाला मोठा धक्का

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -